Pune News : रामभाऊ म्हाळगी शाळेच्या आवारातील जीर्ण पाण्याच्या टाक्यांचा विद्यार्थ्यांना धोका

रामभाऊ म्हाळगी शाळेच्या आवारात टाक्या धोकादायक; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
rambhau mhalgi school area water tank dangerous for students structural audit report
rambhau mhalgi school area water tank dangerous for students structural audit report sakal

Pune News : राजस सोसायटी परिसरातील रामभाऊ म्हाळगी शाळेच्या आवारात असणाऱ्या जीर्ण पाण्यांच्या टाक्यांचा विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी या टाक्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून यामध्ये या टाक्या धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आला असून त्या टाक्या पाडण्यात याव्यात असे म्हटले आहे.

मात्र, तरीही पाणीपुरवठा विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. १९९० च्या आसपास कात्रज ग्रामपंचायत असताना जलजीवन प्राधीकरणाने या टाक्या बांधल्या होत्या. रामभाऊ म्हाळगी शाळेच्या अगदी मैदानालगत वापरात नसलेल्या या जर्जर टाक्या असून त्याच्या आजूबाजूला विद्यार्थी खेळत असतात.

याबाबत शाळेनेही सातत्याने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, कोणाकडूनही याला दाद मिळत नसून विद्यार्थांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे पालकांमध्येही भितीचे वातावरण आहे.

या टाक्यांचे मोठ्या प्रमाणावर टवके निघत असून यापासून विद्यार्थ्यांना धोका आहे. अचानक टाकी किंवा एखादा भाग कोसळला तर विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते. जीर्ण झालेल्या दोन्ही टाक्यांच्या बाजूला १५ फुटावर पत्र्यांचे कुंपन जरी घातलेले असले तरी,

टाकीच्या उंचीचा एकंदरीत विचार करता, टाकी कोसळली तर लांबपर्यंत तिचे आवशेष पडू शकतात. यात पुर्ण काँक्रीटचा वापर असल्याने, मोठ्या मलाब्याच्या ढिगाऱ्याखाली कोणीही सापडू शकते, यातून मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे पालकांचे म्हणणे आहे.

या टाक्यांचे मोठ्या प्रमाणावर टवके निघत असून यापासून विद्यार्थ्यांना धोका आहे. अचानक टाकी किंवा एखादा भाग कोसळला तर विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतू शकते. जीर्ण झालेल्या दोन्ही टाक्यांच्या बाजूला १५ फुटावर पत्र्यांचे कुंपन जरी घातलेले असले तरी,

टाकीच्या उंचीचा एकंदरीत विचार करता, टाकी कोसळली तर लांबपर्यंत तिचे आवशेष पडू शकतात. यात पुर्ण काँक्रीटचा वापर असल्याने, मोठ्या मलाब्याच्या ढिगाऱ्याखाली कोणीही सापडू शकते, यातून मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे पालकांचे म्हणणे आहे.

rambhau mhalgi school area water tank dangerous for students structural audit report
Pune News: काय सांगता? चाकणचा तीन कोटी रुपयांचा फूटपाथच झाला गायब!

माझा मुलगा पुर्वी या शाळेत शिकत होता. मात्र, ही टाकी केव्हाही कोसळू शकते आणि काहीही घडू शकते केवळ या विचारानेच आणि भितीतून मी माझ्या मुलाला म्हाळगी शाळेतून काढले. याबद्दल शाळेच्या शिक्षकांकडे नाराजीही व्यक्त केली होती. परंतु, याबाबत महापालिकेला काही केल्या जाग येताना दिसत नाही.

- संजय भोंडवे, पालक

संबंधित टाक्यांचा धोकादायक असल्याचा अहवाल आला असून त्यापासून विद्यार्थ्यांना धोका आहे. त्यामुळे या टाक्या हटवाव्यात ही आमची मागणी असून याबाबत सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र, याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाही

- आरती राठोड, मुख्याध्यापिका, रामभाऊ म्हाळगी, शाळा

जलजीवन प्राधिकरणने या जागी टाक्या बांधलेल्या असून याबाबत त्यांच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यांच्याकडे पत्रव्यवहार सुरु आहे. मालमत्ता व्यवस्थापनाकडेही आमचा पाठपुरावा सुरु असून लवकरात लवकर या टाक्या पाडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- संदिप मिसाळ, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com