esakal | 'गारवा'चे मालक रामदास आखाडेंचा मृत्यू; तलवारीने झाला होता हल्ला
sakal

बोलून बातमी शोधा

ramdas aakhade

उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखा़डे (वय- ४१ वर्षे) यांचा बुधवारी (ता. २०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील जहागिंर रुग्नालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला.

'गारवा'चे मालक रामदास आखाडेंचा मृत्यू; तलवारीने झाला होता हल्ला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गारवा हॉटेलचे मालक रामदास आखा़डे (वय- ४१ वर्षे) यांचा बुधवारी (ता. २०) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील जहागिंर रुग्नालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. रामदास आखाडे यांच्यावर रविवारी (ता. १८) रात्री दहा वाजनेच्या सुमारास तलवारीने जिवघेणा हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर रामदास आखाडे यांनी मृत्युशी दिलेली झुंज तब्बल बावन्न तासानंतर अपयशी ठरली. रामदास आखाडे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन मुले असा परीवार आहे.

पुणे-सोलापुर महामार्गावर उरुळी कांचन हद्दीतील खेडेकर मळ्याजवळ रामदास आखाडे यांच्या मालकीचे गारवा हॉटेल आहे. रविवारी रात्री पावने दहा वाजनेच्या सुमारास रामदास आखाडे एकटेच हॉटेलमध्ये बसले असतांना, ह़ॉटेलच्या दरवाज्यातून आत आलेल्या आरोपींने तलवारीच्या साह्याने रामदास आखाडे यांच्यावर तलवारीने चार वार केले होते. यात आखाडे गंभीर जखमी झाल्याने, त्यांना उपचारासाठी तात्काळ लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पीटल या खासगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल केले होते.

हेही वाचा: चिंता वाढली! 'बर्ड फ्लू'मुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद

आखाडे यांची प्रकृती आनखीनच गंभीर होत चालली होती. यामुळे रामदास आखाडे यांना पुढील उपचारासाठी काल (मंगळवारी) दुपारी पुण्यातील जहांगिर या खासगी रुग्नालयात दाखल केले होते. मात्र रामदास आखाडे यांची मृत्युशी चाललेली झुज बावन्न तासानंतर अखेर बुधवारी पहाटे अपयशी ठरली. रामदास आखाडे यांच्यावर रविवारी झालेल्या हल्ल्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या हल्ल्यामागील मास्टमाईंड अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. यामुळे हल्ल्याचे नेमके कारण समजु शकलेले नाही. मात्र प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीवरुन हा हल्ला व्यावसायिक स्पर्धेतुन झाला असण्याची शक्यता बळावली आहे.

loading image