

पुणे: रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेची एक जागा देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच दिले आहे. त्यानुसार या निवडणुकीत पक्षाला एक जागा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती मिळालेली नाही. आगामी काळात पाच जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळेल, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. पुण्यात पत्रकार परिषदेत ते रविवारी बोलत होते.