...अन् कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

पुणे: हातावचे पोट, रहायला स्वःताचे घर नाही. काम केले तरच संसाराचा गाडा चालतो. मोठा मुलगा पाचवीत तर छोटा पहिलीत शिक्षण घेत आहे. सर्व काही सुरळीत चालले असताना कर्ता व्यक्तीची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे डॉक्टरांकडून समजते अन् कुटुंबावर अक्षरशः आभाळ कोसळते.

रमेश किसन जैद (वय 40) यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक. कुटुंब चालविण्यासाठी ते तात्पुरती नोकरी करतात. पती-पत्नीनी मिळून मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठ्या करण्याचा ध्यास घेतला. पण, रमेश यांना अचानक त्रास होऊ लागला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांची दोन्हीही मूत्रपिंड निकामी झाल्याचे समजले. हातावरचे पोट त्यामध्ये रुग्णालयाचा खर्च यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. रमेश यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून, किडनी प्रत्यारोपणासाठी पाच लाख रुपये खर्च लागणार आहेत. परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे.

आर्थिक मदतीसाठीः
Ramesh Jaid, 9850880051
Hdfc Bank
A/c no. 07941050031648
Ifsc Code: HDFC0000794

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh jaid need help for hospital