'रामकृष्ण मोरे पुरस्कार' संजय नहार यांना प्रदान 

'रामकृष्ण मोरे पुरस्कार' संजय नहार यांना प्रदान 

पुणे : "सगळ्याच पक्षांमधील कार्यकर्त्यांची संख्या कमी झाली असून, भक्तांची संख्या वाढली आहे. अशा भक्तांमुळेच पक्ष संकटात येतो. समाजात धर्मांधता वाढत असून, त्याचा फायदा राजकीय पक्ष घेत आहेत,'' असे मत ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. 

रामकृष्णहरी कृषी प्रतिष्ठानच्या वतीने "प्रा. रामकृष्ण मोरे जीवन गौरव पुरस्कार' सरहदचे संस्थापक संजय नहार यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, उल्हास पवार, मोहन जोशी, अभिनंदन थोरात आदी उपस्थित होते. 

फुटाणे म्हणाले, "प्रत्येक पक्षात तीन प्रकारचे नेते असतात. रामकाठी बाभूळ म्हणजे त्यांचा संबंध थेट हायकमांडशी असतो. सुबाभूळ वर्गातील नेते कालपर्यंत कुठेच नसतात आणि अचानक त्यांना महत्त्व प्राप्त होते. तिसरा वर्ग म्हणजे येडी बाभूळ. अर्थात, सामान्य कार्यकर्ते. या कार्यकर्त्यांमुळेच कोणताही राजकीय पक्ष उभा असतो.'' 

"रामकृष्ण मोरे यांनी शिक्षणमंत्री म्हणून केलेले काम पुढे आले. मात्र, संस्थाचालक म्हणून त्यांनी केलेल्या कामाकडे दुर्लक्ष झाले. ते अत्यंत प्रामाणिक आणि स्पष्टपणे बोलणारे शिक्षण संस्थाचालक होते,'' अशा शब्दांत डॉ. एकबोटे यांनी मोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. मोरे, पलांडे आणि नहार यांनी या वेळी विचार मांडले. थोरात यांनी प्रास्ताविक केले. 

कॉंग्रेसने प्रत्येक जातीचे महामंडळ काढून जातीयतेला थारा दिला. भाजपही सर्व जातीतील नेत्यांना मंत्रिपदे देऊन तोच कित्ता गिरवत आहे. जातीची महामंडळे काढण्यापेक्षा माणसांची महामंडळ काढण्याची गरज आहे. शाळेतील दाखल्यावरील जात जात नाही, तोपर्यंत जाती निर्मूलन शक्‍य नाही. 
- रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com