सौंदर्यवतींचा रॅम्पवर जलवा...

सौंदर्यवतींचा रॅम्पवर जलवा...

पुणे - नोकरी, व्यवसाय अन्‌ ग्रामीण भागात शिक्षण घेताना मॉडेलिंग क्षेत्राचे क्षितिज खुणावणाऱ्या तरुणींनी ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेचा रॅम्पवॉक गाजविला. या क्षेत्रातील दिग्गजांसमोर एकदा तरी रॅम्पवर चालून या क्षेत्रात यायचे स्वप्न अनेक तरुणी उराशी बाळगून होत्या. त्या स्वप्नांच्या दिशेने आज रॅम्पवर पाऊल पडत होते. 

‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’तर्फे आयोजित ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१९’ स्पर्धेची पुणे केंद्रावरील फेरी उत्साहात पार पडली. यात पुण्यासह नगर, सातारा येथील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुणी सहभागी झाल्या होत्या. 

रॅम्पवॉक आणि स्वतःची ओळख अशी पहिली फेरी पार पडली. त्यानंतर २३ तरुणींची विविध गुणदर्शन फेरीसाठी निवड झाली. नृत्य, गायन, कविता अशा विविध कलांमधून त्यांनी आपले कलागुण दाखविले. काही तरुणींनी मराठी ठसक्‍याची लावणी, स्वतः केलेल्या कविता अन्‌ संगीत सादर केले. त्यानंतर परीक्षकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. काही तरुणी महिला सबलीकरण, स्त्री-सुरक्षा अशा मुद्‌द्‌यांवर प्रगल्भतेने व्यक्त झाल्या.

 परीक्षक म्हणून फॅशन कोरिओग्राफर लवेल प्रभू, आहारतज्ज्ञ निरुपमा एस., मिसेस इंडिया (वर्ल्ड वाइड २०१७) नेहा केळकर-देशपांडे, मनीषा गरुड, अभिनेत्री मृण्मयी कोळवलकर उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील आठ केंद्रांमधून निवडलेल्या तरुणींचे ग्रुमिंग आणि ट्रेनिंग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी १६ फेब्रुवारी रोजी पुण्यात होणार आहे. या स्पर्धेला डिझायनर श्रुती मंगेश, लीज ब्युटी अँड स्पा, ॲमनोरा पार्क टाउन, अॅमनोरा फर्न हॉटेल्स ॲन्ड क्लब, लवेल प्रभू, एथनिसिटी, गिरिकंद हॉलिडेज प्रा.लि., फिटलाइफस्टाइल, डॉ. फरांदे डेंटल हॉस्पिटल, रेनोव्हिजन, श्री विश्‍वानंद चिकित्सालय, रेडिओ वन, छायाचित्रकार नीलेश काळे, आय.एन.एफ.डी. पिंपरी-चिंचवड आणि तनिष्का यांचे सहकार्य लाभले आहे.

मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी ‘सकाळ ’ने चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पूर्वी अश्‍या संध्या नव्हत्या तरी या संधीचा अनेक तरुणींना फायदा होणार आहे.
- नेहा केळकर-देशपांडे,  परीक्षक

प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की आपण आयुष्यात एकदा तरी रॅम्पवॉक करावा अन् क्राऊन घालावा. पुण्यात आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्याची कमतरता जाणविली नाही.
- निरुपमा एस., परीक्षक

मॉडेलिंग क्षेत्रातील माझ्या करिअरची सुरवात अशा स्पर्धांमधूनच झाली. त्यामुळे अशा स्पर्धांचे महत्त्व मला माहिती आहे. त्यामुळेच ‘सकाळ’ने अशा तरुणींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
- मृण्मयी कोळवलकर, परीक्षक

‘सकाळ’ हे मराठी कुटुंबीयांच्या निकटचे वृत्तपत्र आहे. त्यामुळे ‘सकाळ’ने हे व्यासपीठ दिल्याने मॉडेलिंग क्षेत्राबद्दलचा पालकांचा विश्‍वास वाढला आहे.
- सुरभी नेहा श्रीनिवास, स्पर्धक

मी सातारा जिल्ह्यातील पाडे गावातून आली आहे. माझे वडील शेती करतात. माझ्या गावात ब्यूटी पार्लरही नाही. मला मॉडेलिंगची आवड आहे. ‘सकाळ’ने मला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
- साक्षी नवले, स्पर्धक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com