कचरा डेपो बंदचा मुहूर्त हुकणार? 

कचरा डेपो बंदचा मुहूर्त हुकणार? 

पुणे - महापालिकेच्या जुन्या हद्दीसह नव्या गावांत जमा होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्याची घोषणा हवेत विरण्याची शक्‍यता आहे. डिसेंबरनंतर उरुळी देवाची आणि फुरसुंगीतील डेपोत कचरा न टाकण्याचा निर्णयही फसण्याची चिन्हे आहेत. रामटेकडीतील साडेसातशे टनांचा कचरा प्रकल्प रखडला असून, बहुतांशी जुने (छोटे) प्रकल्पही निम्म्याच क्षमतेने सुरू आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत एक हजार ८०० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणे अशक्‍य आहे. 

पुण्यातील कचरा डेपोसाठी ग्रामीण भागात दोन जागा निश्‍चित झाल्या. त्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे पैसेही भरले आहेत. मात्र, त्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सरकारने पूर्ण केली नाही. त्याच वेळी महापालिकाही गप्प असल्यामुळे तेथील कचरा डेपो सुरू करण्याची योजना गुंडाळली जाण्याची  शक्‍यता आहे. 

शहर आणि नव्या अकरा गावांत दररोज जवळपास १८०० ते १९०० टन कचरा जमा होत आहे. त्यापैकी ९०० ते एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. त्यासाठी साडेसातशे टन क्षमतेच्या रोकेमसह छोट्या-छोट्या क्षमतेचे प्रकल्प आहेत. प्रत्यक्षात 

मात्र, रोकेममधून जेमतेम अडीचशे ते तीनशे टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. गेली काही वर्षे त्याची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे महापालिका सांगत आहे. परंतु महापालिका आणि ठेकेदार यांच्यातील वादामुळे तो पूर्ण क्षमतेने कार्यरत होत नाही. दुसरीकडे काही प्रकल्प बंद असून, काही निम्म्याच क्षमतेने  सुरू झाहेत. 

सध्या शहरातील १६०० पैकी ९०० ते एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात  असल्याचा दावा महापालिकेचा आहे. उर्वरित कचरा उरुळी देवाची आणि फुरसुंगी  गावांतील डेपोंत टाकण्यात येतो. गावकऱ्यांचा विरोध आणि डेपोची क्षमता  संपल्याने डिसेंबरपासून कचरा न टाकण्याचे नियोजन पालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे आहे. पण, कचरा न टाकण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे प्रक्रिया प्रकल्प सक्षम नसल्याने महापालिकेचे नियोजन चुकण्याची शक्‍यता आहे.

कचरा जिरविणे, त्यावर प्रक्रिया करण्याचे सूक्ष्म नियोजन आहे. बहुतांशी काम झाले आहे. नव्याने शंभर आणि दोनशे टनांचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. ज्यामुळे आणखी सातशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे. 
- ज्ञानेश्‍वर मोळक, घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com