रांगोळी कलाकार राजश्री भागवत यांना आदर्श युवती अवॉर्ड प्रदान

चंद्रकांत घोडेकर
Friday, 22 January 2021

नारोडी (ता. आंबेगाव) येथील सुप्रसिध्द रांगोळी कलाकार राजश्री नितीन भागवत -जुन्नरकर यांना आदर्श युवती महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न अवॉर्ड 2020 प्रदान करण्यात आला.

घोडेगाव  : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी, मुंबई महाराष्ट्र राज्य या संस्थेकडून महाराष्ट्र राज्यस्तरीय गुणिजन गौरव सोहळ्यात नारोडी (ता. आंबेगाव) येथील सुप्रसिध्द रांगोळी कलाकार राजश्री नितीन भागवत-जुन्नरकर यांना आदर्श युवती महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न अवॉर्ड 2020 प्रदान करण्यात आला.

म्हाडाच्या ५६४७ सदनिकांची आज Online सोडत; कोणाचं गृहस्वप्न होणार साकार?

दरम्यान, हा सोहळा कोरोना सारख्या महामारीमुळे ऑनलाईन पद्धतीने पार पडला. पुरस्कार पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अण्णा बोदाडे, नाना मोरे, बी. बी. कांबळे, सहा आरोग्याधिकारी आणि सर्व कर्मचारी वृंद, यांच्या उपस्थिती मध्ये सन्मानित करण्यात आला.

रांगोळी क्षेत्रात काम करत असताना आळंदी ते पंढरपूर वारीच्या संपूर्ण मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्याचे सेवा गेले 8 वर्षे राजश्री करत आहेत. तसेच सुरत या ठिकाणी नॉनस्टॉप 11 किलोमीटर रांगोळी 5 तासांमध्ये काढून राजश्री यांनी गोल्डन बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव नोंदवले आहे. सुरत, राजस्थान, गोवा, चेन्नई, बंगलोर, मध्यप्रदेश, कर्नाटक व विविध राज्यांमध्ये धार्मिक सामाजिक राजकीय कार्यक्रमातसाठी आमंत्रित केले जाते.

तसेच विविध राज्यांमध्ये कलारत्न, समाजभूषण, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार, पिंपरी चिंचवड भूषण, भोसरी भूषण व अनेक सामाजिक संस्थांकडून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

...तर आमचा पायगुण वाईट आहे म्हणू नका ; अजित पवार यांची टोलेबाजी

रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामध्ये कोरोना महामारी आणि काळजी, झाडे लावा झाडे जगवा, स्त्रीभ्रूणहत्या, लेक वाचवा, पाणी वाचवा, ग्राम स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती असे अनेक सामाजिक संदेश रंगोळीच्या माध्यमातून देण्याचा नेहमी प्रयत्न असतो. ही रांगोळीची कला कुठे ही शिकलेली नाही. ही एक दैवी देणगीच आहे. रांगोळीच्या माध्यमातून संपूर्ण भारत भ्रमण झाले आहे. ईसकाळमध्ये 2 वर्षापूर्वी रांगोळी काढतानाचा त्यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्याला 3 कोटीहून अधिक लोकांनी पाहिले होते. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rangoli artist Rajshri Bhagwat awarded the Adarsh ​​Yuvati Award