रंगात न्हाली तरुणाई... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - शिशिर ऋतू... फाल्गुन वद्य पंचमीचा मुहूर्त... सकाळच्या प्रहरी घरोघरी देवादिकांच्या मूर्तींवर केलेली रंगांची मुक्त उधळण... घरोघरी मिष्ठान्न भोजनाचा बेत आणि मुक्तहस्ते एकमेकांना रंग लावण्यात दंग असलेल्या तरुणाईने शुक्रवारी मनसोक्तपणे रंगोत्सवाचा आनंद लुटला. काही ठिकाणी वनभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते. 

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा अर्थातच होळी पौर्णिमेपासून वद्य पक्षातील प्रतिपदेला धूलिवंदन ते पंचमीपर्यंत विविध समाजांतर्फेही होलिकोत्सव साजरा करण्यात आला. विशेषतः राजस्थानहून येथे स्थायिक झालेल्या नागरिकांनीही येथे उत्साहात होलिकोत्सवाची प्रथा आणि परंपरा जपली. पंचमीला शहरातील विविध मंदिरांमध्येही धार्मिक कार्यक्रम आयोजिले होते. तसेच, प्रथा-परंपरेनुसार भाविकांनी देवाला रंग लावण्याकरिता मंदिरांमध्ये गर्दी केली होती. 

सामाजिक संस्थांतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. नारायणदास फाउंडेशनतर्फे एकलव्य बालशिक्षण न्यास या संस्थेतील विशेष व वंचित मुलामुलींसमवेत रंगपंचमी साजरी करण्यात आली. न्यासाच्या संचालिका रेणू गावस्कर, इंद्रायणी गावस्कर उपस्थित होत्या, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रतीक गुजराथी यांनी दिली. 

सामाजिक कार्यकर्ते सत्येंद्र राठी म्हणाले, ""पंचमीला रविवार पेठेतील श्रीराम मंदिरात एकत्रित आलेल्या भाविकांनी देवाच्या मूर्तीला रंग लावला. राजस्थानी परंपरेप्रमाणे पंचमीला "गोठ' म्हणजे वनभोजनाची परंपरा येथेही जपण्यात येते. यानिमित्ताने माहेश्‍वरी समाजातर्फे एम्प्रेस गार्डन येथे वनभोजन आयोजिले होते.'' 

Web Title: rangpanchami celebration

टॅग्स