बलात्कारप्रकरणी पोलिसच फिर्यादी झाल्याने ७ महिन्यांनी गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

घोडेगाव - वचपे (ता. आंबेगाव) येथील एका मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा तब्बल ७ महिन्यांनी घोडेगाव पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी श्‍याम मारुती शिंगाडे (रा. वचपे, ता. आंबेगाव) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरारी आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार झाल्यानंतर या पीडितेने मृत बाळाला जन्म दिला. पीडितेच्या पालकांनी याबाबत कोणतीही तक्रार दिली नाही. वुमन हेल्पलाइन महिला अत्याचार विरोधी समितीच्या नीता परदेशी व पूनम भुमकर यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. 

घोडेगाव पोलिसांनी पालकांना व पीडितेला तक्रार देण्यास सांगितले, पण ते तयार झाले नाहीत. शेवटी पोलिस स्वतः फिर्यादी झाले. त्यानंतर पीडितेने जबाब दिला. जबाबात तिने बलात्कार झाल्याचे सांगितले. आरोपीला शिक्षा होण्यासाठी तिचे बाळ हा पुरावा पोलिसांकडे होता. आंबेगावच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी, सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी डीएनएसाठी बाळ स्मशान भूमीतून बाहेर काढून त्याचे पंचासमक्ष नमुने घेतले. याप्रकरणी डीएनएचा प्रयोग शाळेतून अहवाल आल्यानंतर पुढील तपास केला जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक किरण भालेकर करत आहेत.

Web Title: Rape Case Crime Police