esakal | राज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime_Woman

काही दिवसांपूर्वीच समन्वयाविरुद्द ऍट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झाला होता. याबाबत खराडी परिसरातील एका 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

राज्य शिक्षक सेनेच्या समन्वयकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयाकाविरुध्द समर्थ पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीला ठार करण्याची धमकी देत समन्वयाने महिलेवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले आहेत.

कोरोनामुक्तांसाठी दिलासादायक बातमी; आता पिंपरीमध्ये सुरू होणार कोविड पश्‍चात उपचार केंद्र​

सुनील मधुकर जगताप (वय 52, रा.मुंढवा) असे या समन्वयाचे नाव आहे. जगतापसह एक महिला, कोमलसिंग डोगरसिंग वाणी (वय 45, रा. मुंढवा) आणि राजेश काळुराम गायकवाड (वय 43, रा.खराडी) यांच्यावर बलात्कार, फसवणूक, जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ आदी कृत्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच समन्वयाविरुद्द ऍट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल झाला होता. याबाबत खराडी परिसरातील एका 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत जगताप हा महिलेला वारंवार ब्लॅकमेल करत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मोठी बातमी: औंध संस्थानच्या गायत्रीदेवींची फसवणूक; वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल​

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या पतीचे 2007 पासून विकसनासाठी दिलेल्या जमिनीबाबत काही बिल्डरांसोबत वाद चालू आहेत. तसेच त्यांची शहरात जमीन आहे. या जमिनी संदर्भात त्यांच्या पतीने न्यायालयात येणे जाणे होते. तर जगताप याचेही एका जमिनीच्या प्रकरणासंदर्भात न्यायालयात येणे जाणे सुरू होते. त्यातूनच दोघांची ओळख झाली होती. या ओळखीतून जगताप फिर्यादीच्या घरी येत जात होता. जगतापने फिर्यादीला कॉल करून तुमचा पती जमिनीचा वाद सोडविण्यात पुढाकार घेत नाही. त्यामुळे तुम्ही यात लक्ष घाला. मी ओळखीच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या माध्यमातून तुमची जागा विकसित करून देतो, असे आमिष दाखवले. यानंतर त्यांना भेटायला सोमवार पेठ परिसरात बोलावून घेतले. तेथे एका गॅरेजच्यावरती असलेल्या कार्यालयात त्यांच्यावर बलात्कार केला.

अन्नदात्या, आता पर्याय नाही; बदलावी लागणार 'पीक'पद्धत!​

रोकड घेऊन फसवणूकही केली :
बलात्कारावेळी कोमलसिंग, राजेश आणि महिला आरोपी हे उपस्थित होते. हा प्रकार 2016 साली घडला होता. यानंतर 2019 पर्यंत फिर्यादीला धमकावत त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच फिर्यादीकडून मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन त्यांची फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top