अल्पवयीन मुलीवर ऍसीड फेकण्याची धमकी देवून बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

प्रतिक आंग्रे (वय 25, रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पिडीत मुलगी शाळेत जात असताना आरोपी आंग्रे हा तिचा दररोज पाठलाग करुन त्रास देत असे.

पुणे : अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून तिला अॅसिड टाकण्याची भिती दाखवून व कुटुंबीयांना मारुन टाकण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी आरोपीस अटक केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रतिक आंग्रे (वय 25, रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पिडीत मुलगी शाळेत जात असताना आरोपी आंग्रे हा तिचा दररोज पाठलाग करुन त्रास देत असे. दरम्यान, शनिवारी त्याने मुलीला अडवून तिच्यावर ऍसिड टाकण्याची भिती दाखविली. तसेच तिच्या कुटुंबीयांना मारुन टाकण्याची धमकी देऊन तिचे अपहरण केले.

संघनेते पी. परमेश्वरन यांचे निधन; मोदी, शहा यांच्यासह अनेकांची श्रद्धांजली

मुलीला वाघोली येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच त्याचे चित्रीकरण करुन ते सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. घडलेला प्रकार मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape on a minor girl by threatening to throw acid and kill family in pune