धक्कादायक : बदनामी करण्याची धमकी देऊन मुलीवर बलात्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

धक्कादायक : बदनामी करण्याची धमकी देऊन मुलीवर बलात्कार

sakal_logo
By
जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

लोणी काळभोर : अल्पवयीन मुलीला बदनाम करण्याची धमकी देऊन मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाच्या असल्या वाईट कृत्याने अल्पवयीन मुलगी साडेपाच महिन्याची गरोदर असल्याची महिती समोर आली आहे. चेतन वसंतराव कोटमाळे (वय २७, रा. आळंदी रोड, पुणे ) यांच्याविरोधात मुलीच्या आईने तक्रार नोंदवली बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अल्पवयीन असून, ती आपल्या आईसोबत मामाकडे राहत आहे. मागील 2 ते 3 महिन्यांपासून मुलगी जेवण नीट करत नसल्याचे मामीच्या लक्षात आल्याने मामी वारंवार तिला प्रश्न विचार होती. तरीही मुलीने काही सांगितले नाही. दात दुखण्याचे कारण सांगून जेवण जात नसल्याचे सांगितले. मात्र, 15 मेला तिला दवाखान्यात नेल्यानंतर डाॅक्टरांनी तपासणी दरम्यान सोनोग्राफी करून घेण्यास सांगितले, तर त्या सोनोग्राफीमध्ये मुलगी साडेपाच महिण्याची गरोदर असल्याचे समोर आले.

हेही वाचा: ‘म्युकरमायकोसिस’साठी पुणे महापालिकेची स्वतंत्र नियमावली

मामीनी आणि आईने तिला विश्वासात घेऊन सर्व काही विचारले. एके दिवशी रात्री १२ वाजता चेतनने मला फोन करुन गच्चीवर बोलावून घेतले आणि तुझी बदनामी करेन अशी धमकी देत अत्याचार केले. आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे.

हेही वाचा: लॉकडाउन असूनही पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगार फिरताहेत मोकाट

loading image
go to top