गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 जून 2018

पुणे - टॅटू काढण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन एकाने महिलेवर बलात्कार केला. तसेच संबंधित महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर लैंगिक शोषण केल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

पुणे - टॅटू काढण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन एकाने महिलेवर बलात्कार केला. तसेच संबंधित महिलेचे व्हिडिओ चित्रीकरण व छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वर्षभर लैंगिक शोषण केल्याचेही उघडकीस आले आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने सिंहगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून पोलिसांनी प्रशांत श्रीवास्तव (रा. उंबऱ्या गणपती चौक, धायरी) यास अटक केली, तर श्रीवास्तव याच्या पत्नीविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीवास्तव हा धायरी येथे मेडिकल चालविण्याबरोबरच टॅटू काढण्याचा व्यवसाय करतो. फिर्यादी श्रीवास्तव याच्या दुकानासमोरच कार पार्किंग करत असल्यामुळे त्यांची ओळख झाली. दरम्यान श्रीवास्तव हा टॅटू आर्टिस्ट असल्याने संबंधित महिला त्याच्याकडे वर्षभरापूर्वी टॅटू काढण्यासाठी गेली. त्या वेळी टॅटू काढताना वेदना होऊ नये म्हणून श्रीवास्तव याने वेदनाशामक गोळीऐवजी गुंगीचे औषध दिले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. त्याच वेळी त्याने व्हिडिओ आणि छायाचित्रे काढली.

सोशल मीडियावर व्हिडिओ व छायाचित्र टाकण्याची धमकी देऊन वर्षभर विविध ठिकाणी नेऊन महिलेचे लैंगिक शोषण केले. दरम्यान, या प्रकाराला कंटाळून महिलेने श्रीवास्तवला भेटण्यास नकार दिल्याने चिडून त्याने व्हिडिओ व फोटो मित्रांना पाठवून बदनामी केली. हा प्रकार श्रीवास्तव याच्या पत्नीस कळल्यानंतर तिनेही फिर्यादी महिलेस धमकावीत गर्भपाताच्या गोळ्या विक्रीस भाग पाडले. तसेच पतीविरुद्ध तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर महिलेने श्रीवास्तव व त्याच्या पत्नीविरुद्ध सिंहगड पोलिसात फिर्याद दाखल केली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी. एल. खोडदे तपास करत आहेत.

Web Title: rape on women crime