esakal | वेगाने साकारतेय ‘महाट्रेड’ मार्केट
sakal

बोलून बातमी शोधा

महाट्रेड

वेगाने साकारतेय ‘महाट्रेड’ मार्केट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मार्केट यार्डमध्ये बिबवेवाडी रस्त्यावर ‘सॉलिटेअर’कडून साकारत असलेल्या ‘महाट्रेड मार्केट’ (एमटीएम) वेगाने साकारत असून त्याला पुण्यातील व्यापाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये एक हजारपेक्षा जास्त दुकाने अल्पावधीत आरक्षित करण्यात आली आहेत.

हेही वाचा: अतिक्रमणावर कारवाईसाठी चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला

या फायदेशीर मार्केटची संकल्पना गेल्यावर्षी जूनमध्ये लोकांसमोर आली. व्यापारी बांधवांनी कमिटमेंट ऑफ युनिटी साइन केले आणि ‘कोडनेम बाजार’ या नावाने या प्रोजेक्टचे प्री-लाँच होऊन, नोव्हेंबर २०२० मध्ये ‘एमटीएम’ लाँच झाले. कोरोनाच्या कठीण काळात एमटीएमच्या कन्स्ट्रक्शन साइटवरच सर्व कामगारांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे बांधकाम अतिशय वेगाने सुरू राहिले या प्रकल्पाच्या कामाची गती पाहता पुढील ३ वर्षांत तो पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे.

हेही वाचा: 'असेल जिद्द तर होईल सिद्ध'; पाहा व्हिडिओ

या प्रकल्पाचे प्लिंथ तसेच फाउंडेशनचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी जवळजवळ ६ कोटी ७१ लाख ४४ हजार ३२७ किलो सिमेंट वापरले आहे, जेकी जगातील सर्वात उंच इमारत ‘बुर्ज अल अरब’साठी वापरलेल्या सिमेंटच्या ६० टक्के आहे. या प्रकल्पासाठी लोखंड आणि स्टील २ कोटी ३५ लाख ८७ हजार किलो वापरले जाणार आहे, ते जगप्रसिद्ध ‘आयफेल टॉवर’च्या तीनपट आहे. ‘सॉलिटेअर’ला बेस्ट-मिक्सड डेव्हलपमेंट बेस्ट आर्किटेक्चर डेव्हलपमेंट बेस्ट कमर्शिअल प्रोजेक्ट ऑफ द इयर आदी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या प्रकल्पात चिलर सिस्टमची विशेष व्यवस्था आहे. त्यामुळे एयर कंडीशनिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या विजेच्या खर्चात १५ ते २० टक्के खर्चाची बचत होणार आहे.

loading image
go to top