
जून ते ऑक्टोबर २०१९ या चार महिन्याच्या कालावधीत हा प्रकार घडला. पीडित मुलगी चार बहिणी, भाऊ, आई-वडिलांसह कोंढवा भागात राहत होती.
पुणे : पोटच्या अल्पवयीन मुलीवरच बापाने बलात्कार केला. खटला सुरू झाल्यानंतर पीडित मुलगी आणि तिची आई दोघीही फितूर झाल्या, पण वैद्यकीय पुरावे आणि सरकारी वकिलांनी भक्कमपणे बाजू मांडल्याने बलात्कारी पित्याला न्यायालयाने ३० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
- पुणेकरांनो, रात्री घराबाहेर पडताय, मग ही बातमी नक्की वाचा
विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला. मूळचा उत्तरप्रदेश येथील असलेला मात्र कोंढवा खुर्द भागात राहणाऱ्या ३७ वर्षीय बापाला ही शिक्षा सुनावण्यात आली. याबरोबरच त्याला १५ हजार रुपये दंड देखील भरावा लागणार आहे. अशा प्रकरणाच्या खटल्यात आरोपीला कमी शिक्षा दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. त्यामुळे त्याला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी केली होती.
घटनेच्या वेळी संबंधित मुलगी १५ वर्षांची होती. वैद्यकीय पुरावा, तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक स्वराज पाटील यांची साक्ष आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा नोंदविलेला जबाब गुन्हा सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा ठरला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस हवालदार सचिन शिंदे, पोलिस शिपाई अंकुश केंगळे यांनी मदत केली.
- ब्युटी पार्लरचं ट्रेनिंग देण्याच्या बहाण्याने महिलांना गंडवलं; विश्रांतवाडीतील प्रकार
जून ते ऑक्टोबर २०१९ या चार महिन्याच्या कालावधीत हा प्रकार घडला. पीडित मुलगी चार बहिणी, भाऊ, आई-वडिलांसह कोंढवा भागात राहत होती. संबंधित मुलगी आठवीत शिकत होती. घटनेपूर्वी एक वर्षापासून आरोपी पीडितेशी अश्लील चाळे करायचा. ते कोणाला सांगू नये, यासाठी धमकी देत असत. जूनमध्ये ती शाळेला चालली होती. त्यावेळी तिला आवडत कोणी नसल्याचे पाहून बापाने तिच्यावर बलात्कार केला. कोणाला सांगितल्यास, घरातील सर्वांना हाकलून देण्याची धमकी त्याने तिला दिली. त्यानंतर मुलगी एकटी असताना त्याने वेळोवेळी हे कृत्य केले. त्रास असह्य झाल्याने ११ ऑगस्ट रोजी तिने हा प्रकार आईला सांगितला.
- पुणे : साखरपुड्यात राडा; जेवणावरून झालेला वाद तिघांच्या जीवावर बेतला
पीडिता होती गर्भवती :
दरम्यान मुलगी गर्भवती असल्याचेही निष्पन्न झाले. अचानक तिचा गर्भपात झाला. त्यानंतर १० ऑक्टोबर २०१९ रोजी त्याने आई शेजारी झोपलेल्या पीडितेशी पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्याने दोघींना मारहाण केली. त्यानंतर आईने याबाबत फिर्याद दिली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)