दुर्मीळ धूमकेतू पाहण्याची संधी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पुणे - पुणेकरांना लवकरच दुर्मीळ धूमकेतू बघण्याची संधी मिळणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ‘४६ पी वेरेतनन’ हा धूमकेतू अवकाशात दिसणार आहे. गुरू ग्रह कुलातील हा धूमकेतू साध्या डोळ्यांनीही बघायला मिळणार आहे. 

पुणे - पुणेकरांना लवकरच दुर्मीळ धूमकेतू बघण्याची संधी मिळणार आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ‘४६ पी वेरेतनन’ हा धूमकेतू अवकाशात दिसणार आहे. गुरू ग्रह कुलातील हा धूमकेतू साध्या डोळ्यांनीही बघायला मिळणार आहे. 

आकाश दर्शनासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानचा काळ अतिशय सुंदर असतो. आकाशात दिसणारे तारे आणि ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर फिरणारे ग्रह हे या महिन्यांचे वैशिष्ट्य असते. डिसेंबरमध्ये आपल्याला एका छोट्याशा धूमकेतूचे दर्शन घेता येणार आहे. या महिन्यात हा धूमकेतू आपल्याला बराच काळ दिसत राहील. एप्रिल १९७२ व फेब्रुवारी १९८४ या वर्षी तो गुरू ग्रहाच्या खूप जवळ गेला व परत तिथून निसटल्यानंतर त्याच्या कक्षेवर गुरूच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम दिसून आला. त्यामुळे त्याच्या कक्षा परिभ्रमणाचा कालावधी साधारणपणे सहा वर्षे, सात महिने व पाच वर्षे, पाच महिन्यांनी असा बदलला. अत्यंत अंधाऱ्या जागेवरूनही हा धूमकेतू डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिसू शकेल. 

डिसेंबरच्या सुरवातीला भरणी नक्षत्राच्या दक्षिणेकडून  पूर्वेकडे सरकत गेलेला दिसेल. १६ डिसेंबरला तो पृथ्वीला सर्वांत जवळ म्हणजेच १ कोटी १५ लाख ८६ हजार ३५० किलोमीटरवर असणार आहे. 

धुरकट आणि एका पुंजक्‍यासारखा ४६ पी वेरेतनन’ हा धूमकेतू दिसेल. सध्या त्याला शेपटी दिसत नाही. मात्र, ती त्याच्या गाभ्याच्या पलीकडे असू शकेल. गोल आकारात त्याचा गाभाच आपण बघू शकतो. १२० आर्क मिनीट एवढा त्याचा आकार असला, तरी तो ३० आर्क मिनीट चंद्रापेक्षा लहान दिसेल. 
- अनिरुद्ध देशपांडे, उपाध्यक्ष, ज्योतिर्विद्या परिसंस्था

Web Title: Rare Comet