पुणे : दुर्मिळ धातू देतो सांगून, 51 लाखांना लुबाडले, धक्क्याने झाला मृत्यू

टीम ई-सकाळ
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

एक दुर्मिळ धातू देण्याचे आमिष दाखवून या धातूला बाजारात मोठी किंमत असल्याचे सांगितले.

पिंपरी/पुणे : एक दुर्मिळ धातू देण्याचे आमिष दाखवून 51 लाखांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचा धक्का सहन न झाल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना चिंचवड येथे घडली. सुभाष बेल्हेकर (रा. चिंचवडगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याप्रकरणी त्यांचा चुलत भाऊ अजित शरद बेल्हेकर (वय २५, रा. समर्थनगरी, लिंकरोड, चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कलिम निजाम शेख, शिवाजी विजयशंकर तिवारी, विकास कन्हेश्वर सिंग, बिप्लब हारणडे (पुर्ण नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचा भाऊ सुभाष यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. आरोपींनी अजित व सुभाष यांना डीआरडीओने दिलेल्या परवानगीचे बनावट पत्र, संरक्षण मंत्रालयाचे बनावट कोरे लेटर हेड, कंपनीच्या नावाचे रजिस्टर झालेले कार्ड दाखवून विश्वास संपादन केला.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा 

आणखी वाचा - पुणे देणार कोरोना प्रतिबंधक लस

एक दुर्मिळ धातू देण्याचे आमिष दाखवून या धातूला बाजारात मोठी किंमत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनाही राईस पुलिंगचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी कोलकता येथे बोलवून घेतले. सुभाष यांच्याकडून रोखीने व आरटीजीएसद्वारे ५१ लाख २५ हजार रूपये घेतले. त्यानंतर सुभाष बेल्हेकर यांनी आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला. मात्र, त्यांचा फोन न लागला नाही. यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सुभाष बेल्हेकर यांना याचा धक्का सहन न झाल्याने बेशुद्ध होऊन त्यांचा मृत्यू झाला. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rare stone 51 lakh fraud pimpri chinchwad man died after shocked