हडपसर - इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचा एल्गार

संदिप जगदाळे
शुक्रवार, 25 मे 2018

हडपसर : खोटी आश्वासने देऊन देशवासीयांची फसवणूक करणाऱ्या भाजप सत्ताधाऱ्यांच्या कुचकामी धोरणामुळे इंधन दरवाढ उच्चांक झाला आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणाऱ्या या सरकारने अच्छे दिनचे गाजर दाखवून महागाई वाढविली, निर्ढावलेल्या या सरकारला खाली खेचण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन पुणे महापालिका विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केले.

हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येथील गाडीतीळ चौकात शुक्रवारी गाडीतळ चौकात इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. हातगाडीवर दुचाकी ठेऊन अनोखे आंदोलन करून नागरिकांचे लक्ष वेधले, याप्रसंगी तुपे बोलत होते. तुपे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात माजी महापौर वैशाली बनकर, नगरसेवक योगेश ससाणे, हडपसर महिला अध्यक्षा संगीता घुले, उपाध्याक्ष सविता मोरे, माजी नगरसेवक सुनिल बनकर, डॉ.शंतनू जगदाळे, भानुदास शिंदे, सागरराजे भोसले, रामभाऊ कसबे, प्रवीण ताथोड, योगेश जगताप, अविनाश काळे, कलेश्वर घुले, पंचायत समिती सदस्य दिनकर हरपळे, रोहिणी राऊत, कलेशवर घुले, विक्रम जाधव आदीसह पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैशाली बनकर म्हणाल्या, महागाई मुळे महिलांना घर चालविणे मुश्किल बनले आहे, नुसत्या बैठका घेऊन सरकार महागाईचे विकासासासाठी खोटे समर्थन करीत आहे, महिलांच्या व शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविणाऱ्या या सरकारला तळतळाट लागेल व संतप्त जनता बुरे दिन आणणाऱ्यांना घरचा रस्ता दाखविल्याशिवाय राहणार नाही.

योगेश ससाणे म्हणाले, नोटबंदी, जीएसटी, महागाई यामुळे समान्यांचे हाल होत आहेत, छोटे मोठे व्यापारी अडचणीत आले आहेत, त्यातच आता रोज इंधनवाढ केली जात आहे. सरकारचा यावर अंकुश नाही, सत्तेतील मंत्री भावावाढचे समर्थन करतात, हायफाय संस्कृती आणली जात असताना सामान्य भरडले जाणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायला पाहिजे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashtravadi s agitation against increasing petrol prices