रासपची भाजपकडे 57 जागांची मागणी, इंदापूरही द्या : महादेव जानकर

डॉ. संदेश शहा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

देशातील 17 राज्यात पक्षाचे अस्तित्व असून पक्ष जनाधारवाढतअसल्याचे मतांच्या टक्केवारीवरून दिसून येत आहे. सन 2014 मध्ये पक्षाच्या 2 जिल्हा परिषद असताना युती जागा वाटपात सहा जागा मिळाल्या होत्या. पक्षाचे सध्या 98 जिल्हा परिषदेत सदस्य आहेत.  

इंदापूर : आगामी विधानसभा निवडणूकीत भाजप शिवसेनेशी रासपची युती होणार असून रासपने भाजपकडे 57 जागांची मागणी केली आहे. इंदापूर विधानसभेची जागा रासपला मिळावी यासाठी आपण आग्रही आहे. मात्र या जागेचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत, असे प्रतिपादन दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले. 

इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शहा सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित कार्यकर्तामेळाव्यात मंत्री जानकर बोलत होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळीमेंढी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, रासप प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, महिला प्रदेशाध्यक्ष श्रद्धा भातंब्रेकर, प्रदेश सरचिटणीस अण्णासाहेब रुपनवर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, जिल्हाउपाध्यक्ष किरण गोफणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिलीपधायगुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

मंत्री जानकर पुढे म्हणाले, देशातील 17 राज्यात पक्षाचे अस्तित्व असून पक्ष जनाधारवाढतअसल्याचे मतांच्या टक्केवारीवरून दिसून येत आहे. सन 2014 मध्ये पक्षाच्या 2 जिल्हा परिषद असताना युती जागा वाटपात सहा जागा मिळाल्या होत्या. पक्षाचे सध्या 98 जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. धनगर आरक्षणाची न्यायालयीन लढाई सुरू असली तरी सरकारने धनगर समाजासाठी अनुसुचित जमातीच्या योजना लागू करुन एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. समाजास राजकीय, शैक्षणिक आरक्षण देखील मराठा समाजाप्रमाणे मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
 बाळासाहेब दोडतले म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष वाढीत पुरुषांबरोबर महिलांचाही देखील सहभाग आहे. त्यामुळे मंत्री जानकर यांनी राजे यशवंतराव होळकर मेष योजना आणली असून त्यातुन महिला बचत गटांना दोन कोटी देण्यात येणारआहे.त्यामुळे महिला सक्षमी करणाला चालना मिळणार आहे.

प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हरीश खोमणे तर सुत्र - संचलन तालुकाध्यक्ष सतीश शिंगाडे व संतोष नरुटे यांनी केले. आभार किरण गोफणे यांनी मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashtriya Samaj Paksha leader Mahadev Jankar demands seats to BJP