रेडझोनमध्ये डॉक्टरांच्या मदतीसाठी सरसावले 'आरएसएस'चे 'कोरोना'योद्धा

Rashtriya Swayamsevak Sangh activist rushed to the help to doctors in the red zone
Rashtriya Swayamsevak Sangh activist rushed to the help to doctors in the red zone
Updated on

पुणे : पुण्यातील रेडझोन मध्ये जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणाऱ्या डाॅक्टरांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १०० पेक्षा जास्त स्वयंसेवक 'कोरोना' योद्धा बनले आहेत. एक आठवडा घरच्यांपासून दूर राहून वस्त्यांमध्ये जाऊन 'कोरोना' विरोधातील लढाईत सहभागी झाले आहेत. 


पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहराच्या मध्यवर्ती व पेठांच्या भागात 'कोरोना'चे ८० टक्के रुग्ण आहेत. येथे झपाट्याने रुग्ण असल्याने महापालिकेने दाट लोकवस्ती असलेल्या वस्तीमध्ये जाऊन नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पथक तयार केले असून, एक रुग्णवाहिका डाॅक्टर, महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी यामध्ये आहेत. वस्तीतील नागरिकांना बोलावणे, त्यांना रांगेत उभे करणे, नाव नोंदणी अशी कामे करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तयारी दर्शविली. या सेवाकार्यात सहभागी होण्यासाठी संघाने स्वयंसेवकांकडे विचारणा केली होती. त्यानुसार १०० पेक्षा जास्त स्वयंसेवक यात सध्या सहभागी झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेतर्फे गुरूवार पेठ , नाना पेठ, मंगळवार पेठ, पर्वती दर्शन, पाटील इस्टेट, भवानी पेठ, येरवडा, नागपूर चाळ यासह इतर दाट लोकवस्ती ४० पथकांद्वारे तपासणी सुरू आहे.  या पथकातील स्वयंसेवक आठवडाभर घरापासून दूर रहात आहेत. दिवसभर आरोग्य तपासणीच्या कामात तपासणी केल्यानंतर त्यांची एका ठिकाणी रहाण्याची व्यवस्था केली आहे. असे एक  स्वयंसेवक तीन दिवस या कामात सहभागी आहे. त्यानंतर त्याला तीन दिवस क्वारंटाईन केले जाईल. त्यांची कोरोना टेस्ट केली जाईल, रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावरच स्वयंसेवकास घरी सोडले जाणार आहे.  या स्वयंसेवकांना सुरक्षेसाठी संपूर्ण पीपीई  कीट देण्यात आले आहे. 

पुणेकरांनो, सावधान! कोरोनाच्या बळींचे झालंय शतक

"इतर सेवा कार्यांपेक्षा हे कार्य खडतर व धोकादायक आहे. यासाठी स्वयंसेवकाचे मनोधैर्य असल्याने हे सेवाकार्य सुरू आहे. सुरक्षेसाठी त्यांना प्रशिक्षण दिले आहे. सध्या १०० पेक्षा जास्त स्वयंसेवक कार्यरत आहेत. २९ एप्रिल पासून सुमारे १० हजार नागरिकांची तपासणी झाली आहे." 
- रविंद्र वंजारवाडकर, संघचालक , पुणे महानगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com