esakal | अरे बापरे ! पार्सलच्या बॉक्समध्ये निघाले उंदीर; ट्रान्सपोर्ट कंपनीचा हलगर्जीपणा
sakal

बोलून बातमी शोधा

parcel.jpg

चेन्नईवरून बदली झाल्याने सोहन दोशी यांनी एका ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत घरगुती साहित्य पुण्याला पाठवले. मात्र, जेव्हा ते पुण्यात पोहचले तेव्हा त्यातील अनेक वस्तू तुटलेल्या होत्या. तर साहित्य ठेवलेल्या बॉक्सधून उंदीर बाहेर निघाले.

अरे बापरे ! पार्सलच्या बॉक्समध्ये निघाले उंदीर; ट्रान्सपोर्ट कंपनीचा हलगर्जीपणा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : चेन्नईवरून बदली झाल्याने सोहन दोशी यांनी एका ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत घरगुती साहित्य पुण्याला पाठवले. मात्र, जेव्हा ते पुण्यात पोहचले तेव्हा त्यातील अनेक वस्तू तुटलेल्या होत्या. तर साहित्य ठेवलेल्या बॉक्सधून उंदीर बाहेर निघाले. त्यामुळे ट्रान्सपोर्ट कंपनीच्या गैर कारभाराबद्दल ग्राहक आयोगात गेलेल्या दोशी यांना नुकसान भरपाई मिळाली आहे.

 येवा वाढल्याने खडकवासला धरणातील विसर्गात वाढ


स्कूटर, म्युझिक सिस्टम, टीव्ही मायक्रोव्हेव, कपडे यांसह 36 वस्तू त्यांनी पाठवल्या होत्या. कंपनीने तक्रारदारदाराला नुकसान भरपाई, मानसिक त्रास आणि तक्रार अर्जाचा खर्च मिळून 45 हजार रुपये देण्याचा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. 

'आरटीई'च्या राखीव जागांवरील प्रवेशासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत   

याबाबत सोहन दोशी (रा. आयटी पार्क) यांनी एक्‍सप्रेस कार्गो पॅकर्स व मुव्हर्स (कोलकाता),  पवन चौधरी आणि सुनील चौधरी यांच्याविरोधात अॅड. स्वप्निल झाडे यांच्यामार्फत येथील ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांच्या घरातील साहित्य चेन्नई येथून पुण्याला पाठवायचे होते. त्यासाठी त्यांनी एक्‍सप्रेस कार्गोच्या कार्यालयास भेट दिली. ट्रान्सपोर्ट करायच्या वस्तूंची यादी द्यावी. त्यानंतर त्याची किंमत ठरवली जाईल.

कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात येईल :  डॉ. राजेश देशमुख

सामान घेऊन जाण्यासाठी आकारलेल्या किंमतीच्या तीन टक्के रक्कम विम्यापोटी देणे गरजेचे आहे, असे तक्रारदार यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार पॅकेजची किंमत 38 हजार 810 रुपये व विम्याची रक्‍कम मिळून 41 हजार 810 रुपये कंपनीला देण्यात आले. त्यानंतर सामान पुण्याला पाठवण्यात आले होते. मात्र ते पुण्यात पोहोचलेले संपूर्ण साहित्याची मोडतोड झाली असल्याचे तक्रारदारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रवासात साहित्याचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी कंपनीकडे केली. मात्र, ट्रान्सपोर्ट कंपनीने मागणीची दखल न घेतल्याने ग्राहक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली होती. नोटीस मिळूनही विरोधी पक्षाच्या वतीने कोणीही आयोगात हजर राहिले नाहीत. त्यामुळे तक्रारदाराचे वकील झाडे यांनी केलेल्या युक्तीवादानंतर आयोगाने नुकसान भरपाईचा निकाल दिला.

loading image
go to top