ज्येष्ठ संगीतकार आणि तबलावादक रवी दाते यांचे निधन

ravi date
ravi date

पुणे, ता. 7 : आताच अमृताची बरसून रात्र गेली... पहाटे पहाटे मला जाग आली अशा गझला सुरावटींचा साज चढवून मराठी गझलविश्व फुलविणारे ज्येष्ठ संगीतकार आणि तबलावादक रवी दाते (वय 81) यांचे आज सायंकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगा समीर आणि मुलगी अश्विनी असा परिवार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना संबंधी चाचणी करण्यात आली होती. पण ती निगेटिव्ह असल्याचे त्यांचे पुतणे अतुल दाते यांनी सांगितले.

राज्य सरकारमध्ये खरचं अस्वस्थता आहे का? वाचा शरद पवार यांचं उत्तर
दिवंगत भावगीत गायक अरुण दाते यांचे ते कनिष्ठ बंधू होते. रवी दाते यांनी भावगीताबरोबर गझल हाही प्रकार निवडला होता. त्यांनी सुरेश भट यांच्यासह अनेक गझलकारांच्या रचनांना संगीताचा साज चढविला होता. त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गझल अनेक कलाकारांनी गायलेल्या आहेत.

समजुनी व्यथेला समजावता न आले... चंद्र आता मावळाया लागला... दुभंगून जाता जाता यांसारख्या त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गझला रसिकांच्या आजही ओठावर आहेत. सुरेश भट यांच्या गझलांना संगीत दिलेली रंग मैफलीचा ही ध्वनिफित त्यावेळी गाजली होती. यातील गझलांचे गायन सुरेश वाडकर यांनी केले होते. मराठी माणसाच्या भावविश्वात अजरामर असलेला शुक्रतारा या भावगीतांच्या अनेक कार्यक्रमात त्यांनी गायक अरुण दाते यांना तबल्यावर साथसंगतही केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com