Vidhan Sabha 2019 पुणे : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर रवींद्र भेगडे यांची माघार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

मावळमध्ये सुरवातीला भाजपकडून इच्छूक असलेले रवींद्र भेगडे यांनी बंडखाेरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, मात्र त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर रवींद्र भेगडे यांनी माघार घेतली आहे.

मावळ : मावळमध्ये सुरवातीला भाजपकडून इच्छूक असलेले रवींद्र भेगडे यांनी बंडखाेरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला, मात्र त्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर रवींद्र भेगडे यांनी माघार घेतली आहे. त्यांची मनधरणी करण्यात आज अखेर भाजप व बाळा भेगडे यांना यश आले आहे. 

यापुढे भाजपचे काम करणार असल्याचं रवींद्र भेगडे यांनी सांगितले, मात्र रवींद्र भेगडे याना पुढं काय आश्वासन मिळालं आणि ते पूर्ण होणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे विरूद्ध राष्ट्रवादी-काॅग्रेस आघाडीचे सुनील शेळके अशीच लढत हाेणार आहे. ही लढत चुरशीची  हाेणार, असेच दिसते आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ravindra begde withdrawal after the Chief Minister's visit