Pune News : धंगेकरांनी कसबा सोडून कोथरूडची चिंता करू नये; धीरज घाटे यांची टीका

आमदार रवींद्र धंगेकर यांनी कसब्याकडे लक्ष द्यायचे सोडून कोथरूडची चिंता करणे हस्यास्पद आहे.
Ravindra Dhangekar and Dheeraj Ghate
Ravindra Dhangekar and Dheeraj Ghatesakal

पुणे - आमदार रवींद्र धंगेकर यांनी कसब्याकडे लक्ष द्यायचे सोडून कोथरूडची चिंता करणे हस्यास्पद आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पत्रकार परिषदेत केली.

कुख्यात गुंड शरद मोहोळ यांच्या हत्येनंतर रवींद्र धंगेकर यांनी ‘गुन्हेगारी मुक्त भयमुक्त कोथरूड’ करा अशी मागणी करताना भाजप नेत्यांवर आरोप केले. त्याला घाटे यांनी उत्तर दिले. यावेळी सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत जोशी, वर्षा तापकीर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी उपस्थित होते.

घाटे म्हणाले, ‘काँग्रेसचे तात्पुरते आमदार कायम ठेकेदारांच्या गराड्यात फिरणारे रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टी वर टीका केली. जो व्यक्ती अधिकाऱ्यांना मारहाण करतो, त्यांना आमच्या नेत्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. धंगेकर हे सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने करत असून, ते हवेने भरलेला फुगा असून हा फुगा लवकरच फुटेल.

चंद्रकांत पाटील हे गेल्या साडेचार वर्षात मोहोळला कधीही भेटले नाहीत, त्यामुळे धंगेकर यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही, असे घाटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com