esakal | पुणे ZPच्या 56 जणांच्या दिव्यांग दाखल्यांची ससूनमध्ये फेर तपासणी

बोलून बातमी शोधा

Re-examination of disability certificates of 56 disabled employees in Zilla Parishad}

पुणे जिल्हा परिषदेमध्ये सन २०१५ ते २०२१ दरम्यान बनावट दिव्यांग दाखल्याच्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या, पदोन्नती व बदल्या झाल्या आहेत. अधिकारी व कर्मचारी गेल्या पाच वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत असून ते वेतनासह सर्व लाभ घेत असल्याचा तक्रार अर्ज दाखल झाला होता. त्यानुसार, दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणीबाबत जिल्हा परिषद स्तरावर डिसेंबर २०२० मध्ये समिती स्थापन केली गेली आहे.

pune
पुणे ZPच्या 56 जणांच्या दिव्यांग दाखल्यांची ससूनमध्ये फेर तपासणी
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

खडकवासला : पुणे जिल्हा परिषदेत बनावट दिव्यांग दाखल्या संदर्भात ५६ जणांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी ससून रुग्णालयामार्फत केली जाणार आहे. याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास विभागाने लेखी उत्तरात दिली आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत यासंदर्भात लेखी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास ग्रामविकास खात्याने लेखी उत्तर दिले आहे. 

पुणे जिल्हा परिषदेमध्ये सन २०१५ ते २०२१ दरम्यान बनावट दिव्यांग दाखल्याच्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या, पदोन्नती व बदल्या झाल्या आहेत. अधिकारी व कर्मचारी गेल्या पाच वर्षांपासून विविध पदांवर कार्यरत असून ते वेतनासह सर्व लाभ घेत असल्याचा तक्रार अर्ज दाखल झाला होता. त्यानुसार, दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणीबाबत जिल्हा परिषद स्तरावर डिसेंबर २०२० मध्ये समिती स्थापन केली गेली आहे.

हेही वाचा - खुशखबर! एक रुपयात मिळणार भरड धान्य, 'या' कुटुंबांना मिळणार लाभ

या समितीने विविध विभागामध्ये असलेली सर्व संवर्गाची मागील तीन वर्षाची दिव्यांग प्रमाणपत्रानुसार करण्यात आलेली सरळसेवा भरती, पदोन्नती व बदल्या अशा १८० कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी केली आहे. त्यापैकी दिव्यांगात्वाचा विचार करुन ५६ दिव्यांग कर्मचाऱ्यांची फेर तपासणी करण्याबाबत ससुन सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता व वैद्यकीय अधिक्षकांना कळविले आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. 

याबाबतीत बनावट दिव्यांग दाखल्याच्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या नियुक्त्या, पदोन्नती व बदल्या झाल्याचे व हे अधिकारी व कर्मचारी गेल्या पाच वर्षापासून विविध पदांवर कार्यरत असून वेतनासह लाभ घेत असल्याचे अद्याप निदर्शनास आले नाही. असे देखील या उत्तरात नमूद केले आहे.
 
हेही वाचा - धोक्याची घंटा! दर महिन्याला ९ अल्पवयीन मुलींचा गर्भपात...