esakal | पुण्याहून मुंबईत पोचता येणार ४५ मिनिटांत

बोलून बातमी शोधा

Bullet Train

पुण्याहून मुंबईत पोचता येणार ४५ मिनिटांत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्याहून (Pune) मुंबई (Mumbai) ४५ मिनिटांवर, तर सोलापूर (Solapur) एक तासावर... हैदराबादलाही (Hyderabad) साडेतीन तासांत पोचता येणार आहे. कारण, मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) (हायस्पीड रेल कॉरिडॉर) कामाने वेग घेतला आहे. त्यासाठीचे सर्वेक्षण (Survey) अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या १० दिवसांत हवाई सर्वेक्षणाच्या (लीडर सर्वेक्षण) कामाला (Work) सुरवात होणार आहे. (Reach Mumbai from Pune in 45 minutes Bullet Train)

मुंबई-पुणे हे अंतर ११ मिनिटांवर आणणारा ‘हायपरलूप’ हा प्रकल्प मध्यंतरी राबविण्याचा विचार ‘पीएमआरडीए’ने केला होता. मात्र, तो गुंडाळण्यात आला. भारतीय हायस्पीड रेल्वे निगम लिमिटेडने देशात अशा प्रकारे आठ ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे हैदराबाद असे दोन प्रकल्प असून त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तातडीने प्रकल्पाचेही काम हाती घेणार आहे.

हेही वाचा: आई-पत्नीचे दागिने गहाण ठेवून केले कोविड हॉस्पिटल सुरू

असा वाचणार वेळ

सध्या मुंबईवरून रेल्वेने पुण्याला येण्यासाठी दोन ते अडीच तास लागतात. हे अंतर बुलेट ट्रेनमुळे ४५ मिनिटांवर येणार आहे. तर पुण्यावरून हैदराबादला शताब्दी रेल्वेने जाण्यासाठी ८ ते ९ तास लागतात. अन्य रेल्वेला हेच अंतर कापण्यासाठी दहा ते बारा तासांहून अधिक कालावधी लागतो. तो साडेतीन तासांवर येणार आहे.

बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये

  • पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे

  • स्वतंत्र ट्रॅक टाकणार

  • रूळ स्टॅंडर्ड गेजचे असणार

  • भूकंप झाल्यास आपोआप ब्रेकिंगसाठी अलार्म सिस्टिम

  • १४,००० कोटी प्रकल्पाचा अंदाजे खर्च

  • ७५० प्रवासी क्षमता

  • २२० ते ३५० प्रतिकिलोमीटर वेग

  • ७११ किलोमीटर मुंबई-हैदराबाद मार्गाची लांबी

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा