esakal | भल्या पहाटे केलेल्या सायलींगचे फायदे एकदा वाचाच...
sakal

बोलून बातमी शोधा

भल्या पहाटे केलेल्या सायलींगचे फायदे एकदा वाचाच...

-आरोग्यदायी सायलींगच्या व्यायामात आता मुलींचाही वाढता कल

-लाॅकडाऊन शिथीलतेत गर्दी टाळून मुक्त आॅक्सीजनसाठी पुरंदरला सकाळचे फिरणे वाढतेय 

भल्या पहाटे केलेल्या सायलींगचे फायदे एकदा वाचाच...

sakal_logo
By
श्रीकृष्ण नेवसे

सासवड ः कोरोना महामारीने व त्यातूनही बदललेल्या जीवनशैलीमुळे अलीकडे मोकळ्या हवेत फिरणे, प्राणायम, योगासने करणारांची संख्या पुन्हा वाढताना.. भल्या पहाटेपासून सकाळपर्यंत सायलींगचे प्रमाणही वाढते आहे. पुण्याजवळील या पुरंदर तालुक्यातील बहुतेक घाटरस्त्यांमुळे सायकलींग करणाऱया अनेक तरुण व ज्येष्ठांची संख्या लक्षणीय वाढतेय. त्यातच लाॅकडाऊन शिथीलतेत आता महिला व मुलींचीही सायकलींगच्या व्यायामात संख्या हळु हळु वाढते आहे. 

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

पूर्वी वाहने कमी होती, त्यामुळे सायकल अधिक प्रमाणात वापरली जायची. आता वाहने भरपूर असूनही पहाटेच्या आरोग्यदायी फिरण्यासाठी व निसर्गसानिध्यातील मुक्त आॅक्सीजन घेत एरोबिक व्यायामाचा आनंद लुटण्यासाठी मुली, महिलाही सायकल हाती घेऊ लागल्यात., ही कौतुकास्पद बाब आहे. त्यातून लयाला गेलेली सायकल दुकाने तालुकापातळीवर पुन्हा कात टाकू लागली आहेत. तालीम, व्यायामशाळा, जीमलाही लाॅकडाऊनमध्ये खिळ बसली होती. त्यातून व संचारबंदीतून व्यायामाच्या सवयीला लाॅकडाऊन काळात मुरड अनेकांना घातली होती. ती सवय आता पूर्वपदावर येत असताना.. व्यायामासाठी अधिक लोकांच्यात मिसळून वेळ घालविण्यापेक्षा  बहुउद्देशीय आनंद व फिटनेस पदरी घेण्यासाठी सायकल चालविण्याला पु्न्हा एकदा महत्व वाढले आहे. त्यातही महिला - मुलींची संख्या वाढत असल्याचे दिसते. हडपसर व सासवडच्या पेडल वाॅरीयर्सचे पदाधिकारी डाॅ. राजेश दळवी म्हणाले., इकडे खूप सकाळी कमी वर्दळीचे घाटरस्ते, चढउताराचे रस्ते अधिक असल्याने सायकलींगमधून चांगला व्यायाम होतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सायकल चालविण्याचे फायदे...
-इंधन बचत 

-धुराचे, आवाजाचे प्रदुषणही नाही  

-सायकलींचा देखभाल दुरुस्ती खर्च अल्प

-रस्ते नुकसान नाही, वाहतुक कोंडी किंवा खोळंबा नाही 

-पार्कींग सोपे

- सायकलींगमधून एरोबिक व्यायाम

-श्वसन वाढते, मधुमेह, रक्तदाब नियंत्रित होतो

-लठ्ठपणा कमी होतो, सांधे, हाडे, मांसपेशी, ब्रेनसेल्स, स्नायूंचे बळकटीकरण होते.

-चरबी, कॅलरी बर्न होतात

-रात्रीची झोप चांगली लागते

-रोगप्रतिकारक शक्ती वाढून एकाग्रता वाढते.

सध्या आॅनलाईन शिक्षण सुरु आहे. पण घरात बसून व्यायाम राहीला नको. म्हणून कोरोनाचे नियम पाळून तीन - चार कि.मी. सायकलींगला मैत्रीणींसह जाते. शिवाय चालून झाले की, मास्क घालून सोशल डिस्टंस ठेवून आमच्या गप्पाही होतात. दिवसभर त्यातून उत्साह टिकून राहतो. -प्रांजल प्रशांत मेढेकर (विद्यार्थीनी, सासवड) 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी अगोदर फिटनेससाठी डाएट प्लॅन करीत होतो. पण लाॅकडाऊन शिथीलतेनंतर आता रोज किमान 15 ते 50 कि.मी. सायकलींग करतोय. गावातील तरुणांची व ज्येष्ठांचीही संख्या आता वाढत आहे. याचा अर्थ इकडे गावोगावी लोकांमध्ये आरोग्यदायी पध्दतीने सायकलीची गोडी वाढत आहे.-अनिल झेंडे (उद्योजक, गारवा उद्योग समुह-दिवे, ता. पुरंदर)

निमशहरी सासवडसाऱख्या भागात कमी झालेले सायकलींचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. आजोबांपासूनचे 62 वर्षांचे सायकल दुकान नव्याने कात टाकून अनेक प्रकारच्या सायकलींसह दिड वर्ष झाले ग्राहकांच्या सेवेत सज्ज केले. कारागीर जहीर अहमद, सेल्समन शकील मणेर, रविंद्र बोत्रे यांना दररोज विक्री, देखभाल - दुरुस्तीचे काम आहे. तीन ते तीस हजार रुपये किंमतीच्या सायकली असून महिन्याकाठी 45 ते 50 लहान मोठ्या सायकलींची विक्री होते. -पप्पूशेठ टिळेकर, राजेंद्र सायकल्स, सासवड, ता. पुरंदर