
वाचा उद्या पुण्यात कुठे, कोणती आणि किती लस असणार आहे उपलब्ध
पुणे : राज्य सरकारकडून शहरासाठी २८ हजार कोव्हीशील्ड लसीचे डोस उपलब्ध झाले असून, ४५ ते पुढील गटासाठी ११२ केंद्रांवर उद्या (बुधवारी) लसीकरण होणार आहे. यातील २० टक्के लस पहिल्या डोससाठी ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांसाठी राखीव असतील. तर कोव्हॅक्सीनचा दुसरा डोस फक्त सहा केंद्रांवर उपलब्ध असेल.
४५ वर्षांवरील नागरिकांसाठी उद्या ११८ केंद्र उपलब्ध असतील. यात ११२ केंद्रांवर कोव्हिशील्ड लस उपलब्ध असले. यामध्ये ६३ ठिकाणी १५० डोस तर ठिकाणी ४९ ठिकाणी प्रत्येकी १०० डोस देण्यात आलेले आहेत. अनेक दिवसानंतर पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध झाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून दुसऱ्या डोससाठी प्रतिक्षेत असलेल्या ज्येष्ठांसह इतर नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे.
हेही वाचा: पुण्यात लाखभर ज्येष्ठ लसीविना; २.७१ लाख ज्येष्ठांनी घेतला पहिला डोस
१८ ते ४४ साठी केवळ दोन केंद्र
१८ ते ४४ वयोगटासाठी कोव्हीशील्डचे केवळ १ हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे
राजीव गांधी रुग्णालय व कमला नेहरू रुग्णालय येथे प्रत्येकी ५०० डोस उपलब्ध करून दिले आहेत. लसीकरणाबाबत उशिरा निरोप मिळाल्याने याचे बुकिंग उद्या सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.
शासन स्तरावर निर्णयाचा गोंधळ
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण बंद असेल अशी घोषणा केली. पण त्याच वेळी महापालिकेला १८ ते ४४ या गटासाठी २८ हजार कोव्हीशील्डचे डोस उपलब्ध झाले. त्यामुळे नेमके नियोजन कसे करावे याचा प्रश्न पालिके पुढे होता. महापालिकेने शासनाच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांना ही लस १८ ते ४४ गटासाठीच आहे असे सांगितले. मात्र, संध्याकाळ नंतर ही लस ४५ ते पुढील गटासाठी वापरा असा निरोप देण्यात आला. शासन रावरील समन्वयाच्या अभावाने महापालिकाच संभ्रमात पडली होती.
हेही वाचा: घ्या! 18 कोटींचा दंड भरला, पण पुणेकरांनी मास्क नाही घातला!
कोणाला करता येणार लसीकरण
- ज्यांनी कोव्हिशील्डचा पहिला डोस २८ मार्चपूर्वी घेतला आहे अशांना दुसरा डोस घेता येईल.
- कोव्हीशील्डची २० टक्के लस ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांसाठी आहे.
- कोवॅक्सिनचा पहिला डोस १४ एप्रिलपूर्वी घेतलेल्यांना दुसरा डोस दिला जाईल.
- कोवॅक्सिनचा पहिला डोस उद्या मिळणार नाही.
Web Title: Read Where What And How Many Vaccines Will Be Available In Pune
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..