नवीन अभ्यासक्रमासाठी आम्ही सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

खडकवासला - खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयात ‘सकाळ’ माध्यम समूह व लायन्स क्‍लब प्लॅटिनम व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १०वीसाठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित व्याख्यानमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्याख्यानमालेमुळे नवीन अभ्यासक्रमासाठी सज्ज झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. 

लायन्स क्‍लब पुणे प्लॅटिनमचे अध्यक्ष प्रकाश कोटेचा, प्रदीप लुणावत, प्राचार्य भागवत सपकाळ, विजयकुमार शेवाळे, सुषमा नानगुडे, कल्पना शेरे, विजय शेरे, विकास भालेराव आदी उपस्थित होते. शिक्षणतज्ज्ञ विजय कचरे व भगवान पेंडकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. रेश्‍मा पोतदार, कल्याणी चिवे, सिद्धी तामकर, वैभव कांबळे, पूर्वा पवळे व प्रतीक दारवटकर या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. लायन क्‍लबने १०वीच्या प्रथम पाच क्रमांकाच्या पाच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर केली. सूत्रसंचालन शशिकांत जाधव, तर साधना साबळे यांनी आभार मानले.

‘सकाळ’ माध्यम समूहच्या व्याख्यानमालेमुळे नवीन अभ्यासक्रमाबाबतची आमच्यातील भीती गेली आहे.
-रेश्‍मा पोतदार, विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय, डोणजे

ग्रामीण भागातील आम्हा विद्यार्थ्यांना व्याख्यानमाला उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. यामुळे गुणात्मक वाढ होण्यास निश्‍चितच उपयोग होईल.
-कल्याणी चिवे, महात्मा गांधी विद्यालय, खानापूर 

Web Title: Ready for New Syllabus SSC Education