पर्वतारोहण, धावणं, सायकल सफारीची उत्तुंग भरारी 

पर्वतारोहण, धावणं, सायकल सफारीची उत्तुंग भरारी 
Updated on

अडतिसाव्या वर्षापर्यंत घरसंसार व नोकरीत गुंतून राहिलेल्या एकादशी कोल्हटकर यांनी नंतर उंच पर्वतशिखरं गाठायचा सपाटाच लावला. पन्नाशीनंतर सायकल शिकून पुण्याहून काश्‍मीर आणि कन्याकुमारीपर्यंतची मुशाफिरी त्याचप्रमाणे धावण्याच्या स्पर्धांमधील पदकं हे नवल प्रत्यक्ष घडलं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पन्नास ते पंचावन्न वयात पर्वतारोहण, धावणं आणि सायकलच्या मोहिमांमधील उत्तुंग भरारी हे अगदी स्वप्नात घडावं तसं एकादशी कोल्हटकर यांच्याबाबतीत घडत गेलं. त्या म्हणाल्या, ""वयाच्या अडतिसाव्या वर्षांपर्यंत घरसंसार व नोकरीत गुंतून होते. पण एकदा हिमालयातील भटकंतीची संधी मिळाली. मी गेले आणि मग दरवर्षी एकदा तर कधी दोनदाही जातच राहिले. 18 हजार फुटांवरच्या या मोहिमा होत्या. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर (19 हजार फूट) गाठताना विलक्षण समाधान वाटलं. आधी आम्ही मुंबईत होतो. नंतर पुण्यात आल्यावर सायकल शिकले. सरावासाठी पाच-दहा किलोमीटर प्रवास करताना काही समविचारी मंडळींबरोबर जास्तीची अंतरं पार करत नगर, औरंगाबाद, कोल्हापूर असे टप्पे गाठले. नंतर थेट कन्याकुमारी गाठलं. मग काश्‍मीरच्या दिशेने प्रयाण. हे साध्य झाल्याने धावण्याचा अनुभव घ्यावासा वाटला. तिथेही अनेक पदकं मिळाली. मग सायकलिंग आणि धावणं अशा संमिश्र स्पर्धा खुणावू लागल्या. त्यातील यशाचा आनंदही घेते आहे.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

कोल्हटकर यांनी असंही सांगितलं की, आतापर्यंत मी हिमालयातील कैलास मानसरोवर, श्रीखंड कैलास, अन्नपूर्णा सर्किट या शिखरांवर गेले आहे. सायकलवरील पुण्याहून पंढरपूर, मुंबई आणि गोवा अशा प्रवासाने आत्मविश्वासाला पालवी फुटली. धावण्याच्या 21 किलोमीटरपर्यंतच्या 15 स्पर्धेत यश मिळवलं. आपल्याकडील मुंबई मॅरेथॉनबरोबरच सप्तशृंगी गडावरील तसंच लडाखमधील अधिक उंचीवरील मॅरेथॉन आव्हानात्मक होत्या. कोल्हापूरमधील ड्युएथलॉनमध्ये 10 किमी धावणे, 40 किमी सायकल व पाच किमी धावणे हे पाठोपाठ करण्याचा अनुभव सुखावून गेला. कुणीही मनात आणलेली एखादी गोष्ट न थकता प्रयत्नशील राहून साध्य करू शकतं. त्यात वयाचं बंधन आड येत नाही. मी पन्नाशीला स्वेच्छा निवृत्ती घेऊन नवे छंद जोपासले. मात्र कुणीही अचानक उठून असं काही करण्याआधी वैद्यकीय सल्ला तसंच फिटनेस ट्रेनिंग घेऊन पावलं टाकावीत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com