अशोक मोहोळांच्या पुत्राची बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

मोहोळ यांनी निवडणूक लादली...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांशी चर्चा करून सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारीची संधी दिली आहे. निवडीच्या कार्ड समितीमध्ये अशोक मोहोळही सहभागी होते. वास्तविक, संग्राम मोहोळ हे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरीही नाहीत. असे असतानाही त्यांनी या गटामध्ये निवडणूक लादली आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता त्याचा योग्य विचार करेल, असे दिलीप दगडे, अंकुश उभे, महादेव दुडे यांनी सांगितले.

पौड - संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मावळ तालुक्‍यातील सोमाटणे-पवनानगर गटातील तिन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत, तर उर्वरित १८ जागांसाठी २९ उमेदवार रिंगणात आहेत. माजी खासदार अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम मोहोळ यांनी पौड-पिरंगुट गटात बंडखोरी केली आहे. तथापि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन सर्वानुमते पॅनेलच्या उमेदवारांची नावे जाहीर केली. या पॅनेलमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंगळवारी (ता. ४) पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून काहींनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले, तर काहींनी स्वेच्छेने माघार घेतली. पौड- पिरंगुट गटात नवले यांच्या पॅनेलमधून दिलीप दगडे, अंकुश उभे, महादेव दुडे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, या गटात माजी खासदार अशोक मोहोळ यांचे पुत्र संग्राम यांनी बंड पुकारत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. हिंजवडी- ताथवडे गटात विदुरा नवले, बाळासाहेब बावकर, तुकाराम विनोदे या पॅनेलच्या उमेदवारांविरोधात पांडुरंग राक्षे यांनी बंडखोरी केली आहे.

दहा वर्ष आधीच सौरडागांचे अनुमान करणे होणार शक्य ; 25 व्या चक्राला सुरवात 

मावळ तालुक्‍यातील तळेगाव- वडगाव गट - बापूसाहेब भेगडे, ज्ञानेश्वर दाभाडे, शिवाजी पवार या पॅनेलच्या उमेदवारांविरोधात बाळासाहेब नेवाळे, पंढरीनाथ ढोरे, तुकाराम नाणेकर यांनी बंडाचे निशाण फुंकले आहे, तर सोमाटणे- पवनानगर गट - नरेंद्र ठाकर, सुभाष राक्षे, श्‍यामराव राक्षे हे बिनविरोध निवडून आले आहेत. खेड- शिरूर- हवेली गट - प्रवीण काळजे, मधुकर भोंडवे, दिनेश मोहिते, अनिल लोखंडे हे नवले यांच्या पॅनेलचे उमेदवार असून, अरुण लिंभोरे यांनी बंडखोरी केली आहे. 
महिला प्रतिनिधींच्या दोन जागांसाठी ताराबाई सोनवणे, शुभांगी गायकवाड, रूपाली दाभाडे या रिंगणात असून, दाभाडे यांनी बंडखोरी केली आहे. भटक्‍या विमुक्त जाती व जमातीच्या गटात नवले यांच्या पॅनेलचे उमेदवार बाळकृष्ण कोळेकर यांच्या विरोधात शिवाजी कोळेकर, सुरेश जाधव यांनी दंड थोपटले आहे. इतर मागासवर्ग प्रतिनिधींमध्ये पॅनेलचे चेतन भुजबळ यांच्या विरोधात अरुण लिंभोरे हे रिंगणात आहेत. अनुसूचित जाती- जमाती गटात बाळू गायकवाड यांच्या विरोधात सखाराम गायकवाड उभे ठाकले आहेत.

कारखान्याच्या संचालक निवडीबाबत मला किंवा वडिलांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे मी कोणत्याही पॅनेलमध्ये न जाता स्वतंत्रपणे निवडणूक लढणार आहे. मतदारांपर्यंत पोचणार असून, ते जो निर्णय देतील तो मला मान्य राहील.
- संग्राम मोहोळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebellion of Ashok Mohols son politics