दहा वर्ष आधीच सौरडागांचे अनुमान करणे होणार शक्य ; 25 व्या चक्राला सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

कोलकता येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ.नंदि, आशिया पॅसिफिक सौरभौतिकी परिषदेत बोलत होते. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) आशियातील सौर भौतिकशास्त्रज्ञांच्या पाचव्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : सूर्याच्या पृष्ठभागावर विशिष्ट कालावधीने चुंबकीय ध्रुव निर्माण होतात. पृथ्वीवरून गडद रंगाचे दिसणाऱ्या या क्षेत्राला सौरडाग असे म्हटले जाते. तारे, ग्रह यांसह अवकाशातील हवामानावर सर्वाधिक परिणाम करणाऱ्या या सौरडागांचे दशकभराचे पूर्वानुमान करणे शक्‍य असल्याची माहिती, सौरभौतिकशास्त्रज्ञ डॉ.दिबयंदू नंदि यांनी दिली आहे. 

रॉयल एनफिल्डचं 'ते' मॉडेल होणार इतिहासजमा

कोलकता येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेतील (आयसर) भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ.नंदि, आशिया पॅसिफिक सौरभौतिकी परिषदेत बोलत होते. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्रात (आयुका) आशियातील सौर भौतिकशास्त्रज्ञांच्या पाचव्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. नंदि म्हणाले,"अवकाशातील हवामानावर सूर्याच्या पृष्ठभागातून बाहेर पडणाऱ्या प्लाझ्मायुक्त सौर वादळाचा परिणाम होतो. तसेच, सूर्याच्या चुंबकीय क्षेत्रामध्येही अशा डागांमूळे मोठा बदल होतो. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी चुंबकीय ध्रुव असलेल्या अशा डागांची तपशीलवार माहिती असणे गरजेचे आहे.'' साधारणपणे सौरडागांचे चक्र 10 ते 11 वर्षांचे असते. मागील 50 वर्षांच्या सातत्यपूर्ण निरीक्षणे आणि संशोधनानंतर सौर डागांच्या एका चक्राचे पूर्वानुमान काढणे शास्त्रज्ञांना शक्‍य झाल्याचे डॉ. नंदी म्हणाले. सध्यातरी फक्त पुढील एकाच चक्राचे पूर्वानुमान शास्त्रज्ञ वर्तवू शकतात. त्यापुढील सौरडागांच्या चक्रांबाबत शास्त्रज्ञ सध्या तरी अनभिज्ञ आहेत. 

बॉम्बे सॅपर्सच्या पुण्यातील मुख्यालयात साकारले रॉयल एनफिल्‍डचे स्मारक
 
सौर वादळांचा तापमानवाढीशी संबंध नाही! 
जगभरातील तापमानवाढ ही काही अंशी सुर्यातून बाहेर पडणाऱ्या आणि पृथ्वीपर्यंत येणाऱ्या मोठ्या सौर वादळांवर अवलंबून आहे, असे मत साधारणपणे व्यक्त केले जाते. याबद्दल डॉ. नंदियांना विचारले असता त्यांनी हा निष्कर्ष पूर्णतः चुकीचे असल्याचे म्हटले. ते म्हणाले,"जागतिक तापमानवाढ ही माणसाच्याच कुकर्माची देण आहे. सौरवादळांचा कोणताही परिणाम पृथ्वीच्या तापमानवाढीवर होत नाही. 

इस्रोच्या वैज्ञानिकांसह उन्हाळ्याची सुट्टी घालविण्याची आहे? मग 'ही' बातमी वाचा

25व्या सौरडागांच्या चक्राला सुरवात 
सुर्यावर चुंबकीय डागांचे 25वे चक्र सुरु झाले आहे. 2024-25 मध्ये सुर्यावर सर्वाधिक ताकदीचे सौर डाग असणार आहे. तो 25 व्या चक्राचा अतिउच्च क्षण असले. त्यानंतर हळूहळू हे चक्र विलयाकडे जाईल. मागील दशकातील सौरचक्रा इतकेच किंबहुना त्यापेक्षा कमी ताकदीचे हे चक्र असणार आहे, अशी माहिती डॉ. नंदी यांनी दिली.
 
'रॉयल एनफिल्‍ड'ची नवीन हिमालयन बघितली का?
"तारे, ग्रह यांच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या सौर वादळांचा आणि सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास होणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर निरीक्षणे आणि प्रयोगांची आवश्‍यकता आहे. भारताच्या "आदित्य एल-1' या सौरमोहिमेमुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत मिळेल.'' 
- दुर्गेश त्रिपाठी, "आदित्य'मोहिमेतील शास्त्रज्ञ, आयुका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It is possible to predict Sun Spots of a decades said solar scientist Dr. Nandi