खमंग पदार्थांचे सादरीकरण
सहकारनगर - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘सकाळ सोसायटी संवाद’ उपक्रमांतर्गत अमरेंद्रश्री सोसायटी दत्तवाडी येथे आयोजित पाककृती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सीमा ओगले यांनी सादर केलेल्या पुडाच्या करंजीला प्रथम मिळाला.

यात ४९ महिलांनी सहभाग घेत खमंग पदार्थांचे सादरीकरण केले. समोसा, डोसा, खिचडी, पेरूची रबडी, पुडाची करंजी, सोया मशरूम बिर्याणी, भोपळ्याच्या वड्या, बर्फी, बेसन काजू लाडू, मेथीच्या वड्या, दहीवडा आदी पदार्थ महिलांनी घरी तयार करून स्पर्धेत सादर केले. सोसायटीमधील ज्येष्ठ नागरिकांबरोबर लहान मुलांनी विविध गुणदर्शन कला सादर केल्या. स्पर्धेत प्रथम सीमा ओगले, द्वितीय जतिका जैन, तृतीय वीणा कुलकर्णी, चतुर्थ शीतल कानिटकर, पाचवा वृषाली बागूल आणि उत्तेजनार्थ सोनाली निकम यांना पारितोषक देण्यात आली. सहभागी महिलांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून प्रसिद्ध आहारतज्ज्ञ सुजाता नेरूरकर व विद्या ताम्हणकर यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोसायटीचे चेअरमन रवींद्र कुलकर्णी, स्वाती सरनाईक, वैशाली रुईकर आदींचे सहकार्य लाभले.