शेतकऱ्यांनी घेतले १०० टन ऊस उत्पादनाचे तंत्र समजावून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

आळेफाटा (पुणे) : पारगाव तर्फे आळे (ता. जुन्नर) येथे मंगळवारी (ता.२७) एकरी १०० टनापेक्षा जास्त ऊस उत्पादनाचे तंत्र अवगत असलेला तरुण प्रयोगशील शेतकरी विकास चव्हाण यांच्या शेतावर, बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र आणि प्रवरानगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना यांच्या वतीने आयोजित राज्यांतर्गत कृषी अभ्यास दौऱ्यातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शिवार पाहणी करत एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे तंत्र समजावून घेतले. 

बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्र व प्रवरानगरच्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या वतीने आयोजित शेतकरी अभ्यास दौऱ्यात एकूण ८० शेतकऱ्यांचा सहभाग होता. यावेळी येथील प्रयोगशील तरुण पदवीधर शेतकरी विकास चव्हाण यांनी आपल्या शेतात सलग ७ वर्षं घेतलेले एकरी १०० टनाचे ऊस उत्पादन, खोडवा व्यवस्थापन, आडसाली ऊसामध्ये एका एकरमध्ये १२६ टनाचे उच्चांकी ऊस उत्पादन तसेच खोडवा ऊसामध्ये पाचट आच्छादनाचा वापर करून घेतलेले एकरी  ११० टन ऊस उत्पादनाच्या यशोगाथेविषयी शेतकऱ्यांनपुढे विस्ताराने मार्गदर्शन केले.

यावेळी जिवाणू खताचे प्रात्यक्षिक, ऊस शेतीतील वेगवेगळी अवजारे, ठिबक सिंचन वापराचे महत्व, उसामध्ये पाचट आच्छादनाचे फायदे याविषयीही त्यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञ डॉ. संभाजीराव नालकर, ऊस उत्पादन विभाग प्रमुख शैलेश देशमुख, जनसंपर्क अधिकारी महेंद्र उत्तमराव खर्डे, विखे पाटील साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी श्री. पावडे, प्रशांत साळवे (ITC मिशन सुनहरा कल), विजय गाडेकर, प्रवीण जाधव, दीपक खराडे, प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संभाजी चव्हाण, रामदास चव्हाण तसेच गावातील अनेक ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी जिवाणू खत देऊन उपस्थित शेतकरी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: recognizing the techniques of 100 tons sugarcane production taken by the farmers