
भोर (पुणे) : भोर येथील प्राथमिक शिक्षकांच्या मुलींनी दहावीच्या निकालातील आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून सर्वाधिक गुण मिळविण्याचा नवीन विक्रम केला असून, मुलींबरोबर पालक व शिक्षकही अभिनंदनास पात्र आहेत, असे मत गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी व्यक्त केले.
दहावीच्या परीक्षेत अवंतिका हरी महांगरे हिला ९९.४० टक्के, शिवाई सुनील गोरड हिला ९९ टक्के आणि इंग्रजी माध्यमात प्रांजल पंडीत गोळे हिला ९६ टक्के मार्कस् मिळाले. तालुक्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात हे सर्वाधिक गुण आहेत. या तीनही मुलींचे पालक हे प्राथमिक शिक्षक आहेत. अंवतिका महांगरेचे हिचे वडिल हरी महांगरे हे तालुक्यातील रायरी येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून, ती शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. शिवाई गोरड ही राजा रघुनाथराव विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिची आई उषा सुनील गोरड या गोकवडी येथे शिक्षिका आहेत. तर, प्रांजल गोळे ही विद्या प्रतिष्ठानच्या भोर इंग्लिश मिडीयम स्कूलची विद्यार्थिनी असून, तिचे वडिल पंडित गोळे हे चिखलावडे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
पंचायत समिती शिक्षण विभाग, भोर तालुका शिक्षक संघटना आणि एमएससीआयटीचे अधिकृत केंद्र असलेल्या 'रोबोकॉब कॉम्प्युटर्स' या संस्थेमार्फत स्मृतिचिन्ह देऊन या विक्रम केलेल्या मुलींचा सत्कार करण्यात आला. पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी विशाल तनपुरे, गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदाम ओंबळे, रोबोकॉब कॉम्प्युटर्सचे संचालक प्रा. विजय जाधव, सहायक गटविकास अधिकारी कुलदीप भांगे, मिलिंद खोपडे आदीं मान्यवर या वेळी उपस्थित होते.
उच्चशिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा विद्यार्थिनींनी व्यक्त केली. तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांमधील प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रोबोकॉब कॉम्प्युटर्समार्फत संगणक शिक्षणासाठी सहकार्य केले जाणार असल्याचे प्रा. विजय जाधव यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.