बारामती लोकसभा मतदार संघात युवासेनेची नव्याने बांधणी

राजेंद्रकृष्ण कापसे 
मंगळवार, 3 जुलै 2018

खडकवासला (पुणे) : बारामती लोकसभा मतदार संघातील 30 वर्षाच्या आतील युवकांना युवासेनेत काम करण्याची संधी आहे. येथील युवासेनेचा अधिक विस्तार करण्यात येणार असून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना अपेक्षित असलेली संघटना उभारली जाणार आहे. संघटनेला नवीन ओळख देण्यासाठी पुन्हा बांधणी करण्यात येत आहे. त्यासाठी युवासेनेच्या सर्व पदासाठी गुरूवारी (ता. 5) सकाळी 11 वाजता डेक्कन जिमखाना येथील शिवसेना भवन, येथे मुलाखती घेण्यात येणार आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना सचिव सुरज चव्हाण, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर व युवासेना सचिव वरूण सरदेसाई, जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहेत. मुलाखतीच्या वेळी युवासेना महाराष्ट्र कोअर कमिटीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. असे युवासेनेचे विस्तारक सचिन बांगर व जिल्हा युवाधिकारी सचिन पासलकर यांनी सांगितले. 

बारामती लोकसभा मतदार संघातील दौंड, बारामती, इंदापुर, पुरंदर-हवेली, भोर-वेल्हा-मुळशी, खडकवासला (ग्रामीण) तालुक्यातील युवासेना पदाधिकारी म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या युवासैनिकांच्या मुलाखती  होणार आहेत. 

युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे. युवासेनेचा बारामती लोकसभा मतदार संघात विस्तार करून गाव व महाविद्यालय तेथे युवा सेना शाखा संकल्पना राबविण्यात येणार आहे. तालुका व शहर स्तरावर युवासेना पदाधिकारी म्हणून काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या सर्व युवासैनिकांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित रहावे. सोबत आपले छायाचित्र आणावे. इच्छुकांसाठी मुलाखत अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. 

Web Title: recreation of yuvasena in baramati loksabha constituency