पुण्यातील 'या' रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच व्हेंटिलेटरवर

मोहिनी मोहिते
शनिवार, 27 जून 2020

कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने राज्य शासनाच्या सहकार्याने सरदार पटेल रूग्णालयात तातडीने सर्व सोयीयुक्त अतिदक्षता विभाग उभारला. या विभागात आवश्यक असलेला स्टाफच्या मुलाखती सुध्दा झाल्या मात्र, मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची अद्यापपर्यत निवड न झाल्यामुळे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

कॅन्टोन्मेंट (पुणे) : कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने राज्य शासनाच्या सहकार्याने सरदार पटेल रूग्णालयात तातडीने सर्व सोयीयुक्त अतिदक्षता विभाग उभारला. या विभागात आवश्यक असलेला स्टाफच्या मुलाखती सुध्दा झाल्या मात्र, मुलाखतीमधील पात्र उमेदवारांची अद्यापपर्यत निवड न झाल्यामुळे अतिदक्षता विभाग सुरू करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.

'शरद पवारांबाबतच्या 'त्या' वक्तव्यावरून गोपीचंद पडळकर यांनी तात्काळ माफी मागावी'​

पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन रूग्णांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. याचा एक भाग म्हणून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात अतिदक्षता विभाग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तातडीने दोन कोटी 30 लाख रूपयांचे अनुदान मंजुर केले होते. त्यानुसार बोर्ड प्रशासाने देखील लॉकडाऊन असताना देखील निविदा काढून केवळ वीस ते बावीस दिवसात 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरू केला आहे. उर्वरित दहा बेडच्या अतिदक्षता विभागाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या विभागासाठी डॉक्टर-8, परिचारिका-16, स्पेशालिस्ट डॉक्टर-4, आया आणि वॉर्डबॉय-10 आणि उर्वरित सफाई कामगार अशा मिळून सुमारे 40 जणांच्या स्टाफची गरज आहे.    

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या वाढते रूग्ण लक्षात घेऊन बोर्ड प्रशासनाने विशेष बाब म्हणून तातडीने नोकर भरती सुध्दा काढली. ही नोकर भरती 89 दिवसांसाठी करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो. त्यानुसार सर्व प्रक्रीया पार पाडली. त्यानुसार जाहिरातीच्या माध्यमातून उमेदवारांना मुलाखतीसुध्दा बोलविण्यात आले. या उमेदवारांच्या मुलाखती बोर्ड प्रशासन कार्यालयात अनुभवी अधिका-यांनी घेतल्या. या घटनेस वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अजुनही प्रत्यक्षात नोकर भरती झाली नसल्याची बाब पुढे आली आहे. अतिदक्षता विभाग सुसज्ज आहे. मात्र केवळ काही नगरसेवकांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे नोकर भरतीस उशीर होत असल्याची चर्चा प्रशासनातील अधिकारी करीत आहेत. त्यामुळे अतिदक्षता विभाग सुरू होणार की नाही, याबबतच आता प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. अतिदक्षता विभागात नोकर भरती करण्यासाठी आम्हाला का माहिती दिली नाही. असा मुद्दा बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत एका नगरसेवकाने उपस्थित केला. तसेच हा विषय सभेत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे नोकर भरती पुन्हा करावी. अशी भूमिका घेतल्यामुळे भरती लांबणीवर पडली असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पटेल रूग्णालयात सुरू करण्यात येत असलेल्या अतिदक्षता विभागासाठी आवश्यक असलेली नोकर भरतीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. मात्र, अतिदक्षता विभागासाठी आवश्यक असलेली इतर यंत्रणा, रूग्णांसाठी औषधे घेणे गरजेचे होते. त्यामुळे भरती थोडी लांबणीवर पडली. मात्र दोन आठवडयात भरती करण्यात येणार आहे.
-अमित कुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Recruitment in the intensive care unit of Patel Hospital was delayed