पुण्यात 'रेड ऍलर्ट; गेल्या 10 दिवसाइतका पाऊस उद्या एकाच दिवशी जिल्ह्यात पडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

दहा दिवसांचा पाऊस एका दिवसात कसा पडणार? 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गुरुवारी 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 20 सेंटीमीटर म्हणजे 200 मिलीमीटर. पुणे शहरात गेल्या दहा दिवसांमध्ये 200 मिलीमीटर म्हणजे 20 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या वरून गुरुवारी एका दिवसात गेल्या दहा दिवसांमधील पाऊस घाटमाथ्यावर पडणार असल्याचे स्पष्ट होते. 
 
पुणे : पुण्यात गेल्या दहा दिवसात पडलेल्या पावसाएवढा पाऊस येत्या गुरुवारी (ता. 8) एका दिवसात पुणे जिल्ह्यात कोसळण्याची शक्‍यता असून त्यासाठी हवामान खात्याने आज 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे. गेल्या दहा दिवसांत पुणे शहरात सुमारे 200 मिलीमीटर पाऊस पडला आहे. तेवढाच पाऊस गुरुवारी एका दिवसात मुख्यत्वे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर कोसळण्याची शक्‍यता आहे.

दहा दिवसांचा पाऊस एका दिवसात कसा पडणार? 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गुरुवारी 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 20 सेंटीमीटर म्हणजे 200 मिलीमीटर. पुणे शहरात गेल्या दहा दिवसांमध्ये 200 मिलीमीटर म्हणजे 20 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या वरून गुरुवारी एका दिवसात गेल्या दहा दिवसांमधील पाऊस घाटमाथ्यावर पडणार असल्याचे स्पष्ट होते.

पुण्यात रेड ऍलर्ट; गेल्या 10 दिवसाइतका पाऊस उद्या एकाच दिवशी पडणार 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Red alert in Pune Due to heavy rain fall in hill top of pune district