‘रेड डॉट’मुळे सॅनिटरी कचऱ्याचे व्यवस्थापन सुलभ

घनकचरा व्यवस्थापन हा जागतिक स्तरावरील प्रश्‍न असला तरी त्यात सॅनिटरी कचऱ्याला हाताळण्याची समस्या गंभीर आहे.
‘रेड डॉट’मुळे सॅनिटरी कचऱ्याचे व्यवस्थापन सुलभ
Summary

घनकचरा व्यवस्थापन हा जागतिक स्तरावरील प्रश्‍न असला तरी त्यात सॅनिटरी कचऱ्याला हाताळण्याची समस्या गंभीर आहे.

पुणे - घनकचरा व्यवस्थापन (Garbage Management) हा जागतिक स्तरावरील प्रश्‍न असला तरी त्यात सॅनिटरी कचऱ्याला (Sanitary Waste) हाताळण्याची समस्या गंभीर आहे. मात्र पुण्यात राबविण्यात येणाऱ्या ‘रेड डॉट मोहिमे’ने (Red Dot Campaign) सॅनिटरी कचऱ्याच्या व्यवस्थापन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. सेंटर फॉर सायनस अँड एन्व्हायरमेंट’ (सीएसई) या संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या अभ्यासातून ही बाब समोर आली.

घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित देशातील विविध शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या योजना, प्रकल्प आणि प्रयोगांचा अभ्यास सीएसई तर्फे करण्यात आला असून याबाबतचा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला. अहवालानुसार, शहरात दररोज सुमारे दोन हजार २५८ टन कचरा निर्माण होत असून पुणे महानगरपालिका आणि ‘स्वच्छ’ संस्थेच्यावतीने या कचऱ्याचे ९५ टक्के विलगीकरण साध्य केले जात आहे. तसेच देशात इतर शहरांच्या तुलनेत पुण्यात सॅनिटरी कचऱ्यावर मोठ्या प्रमाणात काम होत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

याबाबत स्वच्छ संस्थेचे संचालक हर्षद बर्डे म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांपासून विविध अधिकारी आणि कंपन्यांबरोबर सॅनिटरी कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत चर्चा करत आहोत. २०१६ पासून शहरात रेड डॉट मोहिमेला सुरवात केली. यामध्ये शाळा, महाविद्यालये आणि घरोघरी जाऊन नागरिकांना सॅनिटरी कचरा कसा वेगळा ठेवावा याबाबत माहिती देण्यात येत आहे. शहरात दररोज सुमारे २५ ते ३० टक्के सॅनिटरी कचरा निर्माण होतो. या कचऱ्याचे विलगीकरण, त्यावरील योग्य प्रक्रिया यासाठी रेड डॉट मोहिमेचा माध्यमातून शहरातील ५० टक्के नागरिकांमध्ये या कचऱ्याला हाताळण्याबाबत जागरूक करण्यात आले आहे.’’

‘रेड डॉट’मुळे सॅनिटरी कचऱ्याचे व्यवस्थापन सुलभ
पुण्यात तब्बल ७५०० किमीच्या बेकायदा केबल्स

सॅनिटरी कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया

निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या व्यवस्थापनेसाठी प्रथमच पुनर्प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येत आहे. आतापर्यंत सॅनिटरी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी इनसिनीरेटर, लँडफिल या पद्धतींचा वापर करणे किंवा मिश्रित सुक्या कचऱ्याबरोबर त्याचे चिथडे करून हा कचरा सिमेंट प्लांटला पाठविण्यात येत होता. मात्र हे पर्याय पर्यावरणासाठी हानिकारक होते. त्यामुळे पर्यावरणपूरक पर्याय म्हणून हे प्रकल्प तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पात सॅनिटरी नॅपकिन, डायपरमधील प्लास्टिक, कापड या घटकांना वेगळे करून त्यांची पुनर्प्रक्रिया केली जाऊ शकते. येत्या काही महिन्यात हडपसर येथे हे प्रकल्प तयार होणार असून यामध्ये प्रत्येक वर्षी सुमारे २५०० टन सॅनिटरी कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे शक्य होईल.

‘रेड डॉट’ मोहीम म्हणजे काय?

सॅनिटरी कचऱ्याला (पॅड, नॅपकिन, डायपर) इतर कचऱ्यात न टाकता त्या कचऱ्याला कागदात बांधून त्यावर लाल बिंदू लावून तो वेगळा ठेवण्यात येतो. त्यामुळे कचरा संकलनाच्या वेळी हा कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत वेगळा ठेवणे शक्य होतो, तसेच त्यावर प्रक्रिया करताना अडचणी येत नाहीत.

अशी होते विल्हेवाट...

  • संकलन

  • फीडर पॉइंटवर कचरा पाठविणे

  • पीएमसीच्या वाहनातून ट्रान्स्फर स्टेशनकडे रवाना

  • लँडफिलची प्रक्रिया

मोहिमेची वैशिष्ट्ये...

  • सॅनिटरी कचऱ्याबाबत जबाबदारीची जाणीव करून देणे

  • व्यवस्थापनेसाठी नागरिक, कचरा गोळा करणारे, वाहतुकीत योग्य संतुलन

  • स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी

दररोज निर्माण होणारा कचरा (टक्केवारीत)

  • ४४.२ - ओला कचरा

  • ४४.६८ - सुका कचरा

  • १०.२२ - इनर्ट्स (राडारोडा, माती)

  • ०.९ - इतर (घरातून निर्माण होणारा ई-कचरा, वैद्यकीय)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com