बाललैंगिक अत्याचारांत घट व्हावी - बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 ऑक्टोबर 2018

पुणे - पुणे शहरासह ग्रामीण भागात बाललैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. तसेच बाल गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी योग्य प्रयत्न आणि कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

बापट यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी विश्रामगृहात बाललैंगिक अत्याचार आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर. के पद्मनाभन, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, महिला व बालकल्याण विभागाचे उपायुक्त दिलीप हिवराळे, उपायुक्त रवी पाटील, राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या स्वरदा बापट आदी या वेळी उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘‘अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या मानसिकतेला नष्ट करणे गरजेचे आहे. केवळ कायदेशीर कारवाईवर न थांबता प्रबोधन आणि जनजागृतीवर भर द्यावा लागेल. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे अपेक्षित आहे. महिला अत्याचार व बलात्काराच्या गुन्ह्यांमधील आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी न्यायालयीन पातळीवर प्रयत्न करायला हवेत. या क्षेत्रात काम करण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांना पूर्ण सहकार्य करण्यात येईल.’’

Web Title: To reduce child sexual abuse says Girish Bapat