लग्नावरील खर्चात कपात करून रायगडावरील मुलांचे पालकत्व

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

पुणे - विराज तावरे आणि केतकी मानकर या नवदांपत्याने कमी खर्चात लग्न करून वाचवलेली दोन लाखांची रक्कम किल्ले रायगड परिसरातील मुलांच्या शिक्षणासाठी दिली आणि युवापिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.

विराज हे निरंजन सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते आहेत; संस्थेने रायगड परिसरातील ५० मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे, ही रक्कम त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेकडे लग्न मंडपातच प्रदान केली. या वेळी खासदार संभाजी राजे, विनायक निम्हण, राजेंद्र कोंढरे, सुभाष फाळके, विकास पासलकर, न्यायाधीश उमेशचंद्र मोरे, माधव मानकर, निरंजन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयेश कासट आदी उपस्थित होते. 

संभाजी महाराज म्हणाले, ‘‘अनेकांना केवळ भाषणाची सवय असते. परंतु या नवदांपत्याने शिवरायांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवत केलेले काम कौतुकास्पद आहे. समाजातील प्रत्येकाने गरजू घटकांसाठी काम करण्याकरिता पुढे यायला हवे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शाहू महाराजांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून आपण काम केल्यास समाजपरिवर्तन नक्की घडेल. त्याकरिता लोकांनी या दांपत्याचे कौतुक करण्यापेक्षा अनुकरण करावे.’’

विराज तावरे म्हणाले, ‘‘पत सांभाळण्यासाठी भव्य-दिव्य लग्न सोहळा करून कर्जबाजारी झालेल्यांची अनेक उदाहरणे आहेत. त्या परंपरेला छेद देण्याचे आम्ही दोघांनी ठरवले आणि गरजू मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले. माफक खर्चात लग्न करा, या मराठा क्रांती मोर्चामधील ठरावानुसार आम्ही हा निर्णय घेतला. यापुढेही दरवर्षी ठराविक रक्कम देणार आहोत.’’

Web Title: With the reduction of the cost of Raigad marriage guardianship of children