बियर बारबाबत नवी नियमावली जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

राज्य सरकारने सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार 50 टक्के क्षमतेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेनेही सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.

पुणे : जिल्ह्यात प्रतिबंध क्षेत्र वगळून बियर बार, परमिट रूम सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून, याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी (ता.५) रात्री नियमावली जारी करण्यात आली आहे.

Breaking : हाथरसमध्ये मोठं षडयंत्र; उत्तर प्रदेश पोलिसांकडून १९ एफआयआर दाखल​

राज्य सरकारने सर्व हॉटेल्स, फूड कोर्ट, रेस्टॉरंट आणि बार 50 टक्के क्षमतेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. महापालिकेनेही सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढलेल्या आदेशानुसार परमिट रूम, क्लब आणि बियर बार सुरू ठेवण्याबाबत सुधारित वेळ जाहीर केली आहे. त्यानुसार परमिट रूम, क्लब आणि बियर बार सकाळी साडेअकरा ते रात्री दहापर्यंत सुरू राहतील.

MPSC परीक्षा स्थगित करा अन्यथा...; मराठा क्रांती मोर्चानं काय दिलाय इशारा?

वाईन शॉप आणि बिअर शॉपी सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत सुरू राहतील. देशी दारूचे किरकोळ विक्रीची दुकाने सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत सुरू राहतील.

नियमावली सांगते -
- बार काऊंटर, टेबल आणि ग्राहकांना बसण्याची जागा सॅनिटाईज करण्यात यावी. 
- सोशल डिस्टंसिंगचे पालन अत्यंत आवश्यक. 
- बारमधील आईस कंटेनर, ट्रॉली, वाईन, बिअरच्या बॉटल्स, ग्लास स्वच्छ, सॅनिटाईज करून घ्याव्यात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Regulations have been issued by Pune District Collector for opening beer bars and permit rooms