भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

भिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच सरपंच आणि उपसरपंच पदावर महिलांची वर्णी लागल्यामुळे येथे खऱ्या अर्थाने महिलाराज सुरू झाले आहे.

भिगवण ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयदीप जाधव यांनी कालावधी पूर्ण झाल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. अर्ज करण्याच्या निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी रेखा पाचांगणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

सरपंच लता चोपडे, हेमाताई माडगे, जयदीप जाधव, प्रशांत शेलार, प्रदीप वाकसे, बाळासाहेब शेलार, दत्तात्रय पाचांगणे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने नुतन उपसरपंच याचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे संयोजन ग्रामविकास आधिकारी भिमराव भागवत यांनी केले.

Web Title: Rekha Dattatray Panchangane is upasarpancha of bhigwan