निर्बंध शिथिल करा अन्यथा कायदेभंग करू; भाजप नेत्यांचा इशारा

girish_20bapat.
girish_20bapat.

पुणे- निर्बंधांच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने शहरात संपूर्ण लॉकडाउन केला असून, त्यामुळे पुणेकरांचे जीवनमान ठप्प होणार असून, शहराची अर्थव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर शहरांमध्ये एक नियम आणि पुण्यात वेगळा नियम हे अन्यायकारक आहे. पुण्यात लादलेले नियम तातडीने शिथिल करावेत आणि राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वी जारी केलेली नियमावली लावावी अशी मागणी खासदार गिरीश बापट आणि भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मंगळवारी केली. अन्यथा रस्त्यावर उतरून कायदेभंग करू असा इशाराही त्यांनी दिला. महापालिका प्रशासनाने मंगळवारपासून लागू केलेल्‍या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर बापट आणि मुळीक बोलत होते. खासदार बापट म्हणाले, ‘विमान, रेल्वे, एसटी यांच्यासह संपूर्ण राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार आहे. मात्र पुणे शहराची जीवनवाहिनी असणारी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसगाड्या अत्यावश्यक सेवा वगळता ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. या बससेवेचा दररोज पाच ते सात लाख प्रवासी लाभ घेतात. केवळ पाच रुपयांत प्रवास करता येत असल्याने सर्वसामान्यांना परवडणारी ही सेवा आहे. परंतु ती बंद केल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत.’ 

मुळीक म्हणाले, ‘शहरातील सर्व प्रकाराची दुकाने यापूर्वी सायंकाळी सहावाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र, सुधारित आदेशात अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने वगळता सर्व प्रकाराची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील छोटे व्यावसायिक आणि त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या कर्मचार्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्य नागरिकांना रोजचा उदरनिर्वाह अवघड होणार आहे.’ 

शहरात रात्री आठनंतर संचारबंदी करावी, सर्व व्यावसायिकांना रात्री आठ पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा द्यावी आणि रात्री आठपर्यंत पीएमपीची बससेवा पूर्ववत करावी आदी मागण्या भाजपने केल्या आहेत. त्या मान्य न झाल्यास भाजप कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून कायदेभंग करावा लागेल, असा इशारा पक्षातर्फे देण्यात आला. 

कोरोना लाट : भारतासाठी पुढील चार आठवडे चिंताजनक; केंद्राचा गर्भित इशारा

पुणे शहर भाजपच्या वतीने लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आजपासून विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार स्थानिक स्तरावर लसीकरणासंदर्भात माहिती, मार्गदर्शन, जनजागृती, नोंदणी प्रकि‘या करण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती मुळीक यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com