पुण्यात ऑपरेशन मनी यशस्वी; काय आहे प्रकार वाचा सविस्तर

जितेंद्र मैड
Tuesday, 1 December 2020

मांजराचे पिलू अजूनही चेंबर व पाईप यांच्यामधील एलबो मध्ये अडकलेले आहे. त्यावर दहा हजार लिटरची टाकी होती. सर्वप्रथम ती टाकी रीकामी केली व नंतर . आणि मांजराचे ते गोंडस पिल्लू सुखरूपपणे बाहेर आले. 

कोथरुड : रामबाग कॉलनीतील श्रीकांत ढोले यांच्या गच्चीवर मांजरीने बरीचशी पिल्ले दिली, ती पिल्ले दिवसभर खेळायची. खेळता खेळता एक पिल्लू टेरेसवरील पावसाचे पाणी वाहून नेणा-या पाईपमध्ये घुसले. घसरुन ते मध्येच कुठेतरी अडकले. घाबरलेले ते पिल्लू ओरडू लागले. पिल्लू सतत ओरडत असल्याने ढोले कुटूंबाला पिलाच्या बाबतीत काहीतरी अघटीत घडल्याची जाणीव झाली. त्यांनी शोध घेतला असता पिलू पाईपात अडकल्याचे लक्षात आले. आता पिलाला बाहेर काढायचे तर पाईप कापने हाच एक मार्ग होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व त्यासाठी सुध्दा योग्य प्लंबर हवा होता. ओळखीच्या प्लंबरला फोन करुन उपयोग होईना म्हटल्यावर त्यांनी व्हॉटसअप आणि समाज माध्यमावर निरोप टाकला. त्याचा उपयोग होवून एक प्लंबर आला.

दरम्यान, त्याने प्रथम टेरेस ते बाथरूम पाईप तोडला. मग बाथरूम ते जमीन या भागात असलेला बिडाचा पाइप तोडला, तेव्हा लक्षात आले की, मांजराचे पिलू अजूनही चेंबर व पाईप यांच्यामधील एलबो मध्ये अडकलेले आहे. त्यावर दहा हजार लिटरची टाकी होती. सर्वप्रथम ती टाकी रीकामी केली व नंतर . आणि मांजराचे ते गोंडस पिल्लू सुखरूपपणे बाहेर आले. 

पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी

या सर्व धामधुमीत मांजरी व तीच्या पील्लांचा आवाजातून जो संवाद चालला होता तो मन हेलावणारा होता. कोणत्याही परिस्थितीत पिलाची व त्यांच्या आईची भेट घालून द्यायची याचा आम्ही चंग बांधला होता. पैसे गेले पण अखेर ऑपरेशन मनी यशस्वी झाले याचे समाधान वाटत आहे.-श्रीकांत ढोले 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The release of the kitten from the pipeline

Tags
टॉपिकस
Topic Tags: