विहीरीत पडलेल्या सांबर व उदमांजराची सुटका

दत्ता म्हसकर 
बुधवार, 2 जानेवारी 2019

जुन्नर - विहिरीत पडलेल्या दोन वन्यप्राण्यांना जीवदान देत बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू पथकाने नवीन वर्षाचे स्वागत केले. 

याबाबत डॉ.अजय देशमुख यांनी सांगितले की, वानेवाडी ता.जुन्नर येथील कासम इनामदार यांच्या विहिरीत सांबर पडल्याचे ३१ डिसेंबरला समजल्यानंतर या सांबराचा जीव वाचवून वनविभाग जुन्नरच्या रेस्क्यू पथकाचे व बिबट्या निवारण केंद्राचे सहकारी डॉ. अजय देशमुख व महेंद्र ढोरे यांनी नववर्षाचे स्वागत केले. 

या सांबरास बेशुद्ध केले व नंतर वनपाल शिवाजी सोनवणे, शशिकांत मडके, ज्ञानेश्वर साळुंखे, वनरक्षक रमेश खरमाळे, निलेश विरणक, वैभव वाजे, ग्रामस्थ  स्वप्निल ढोले, रमेश देवडे, चंद्रकांत खिलारी, विकास देवडे, खंडू देवाडे, उमेश खिलारी, मीननाथ देवाडे, योगेश खिलारी, विशाल बोऱ्हाडे आदींच्या मदतीने या सांबरास विहीरीतून बाहेर काढले.

तर मंगळवार ता.1 जानेवारी रोजी सायंकाळी एक उद मांजर खामगाव ता.जुन्नर येथील चंद्रकांत पठारे यांच्या विहिरीत पडल्याचे उपसरपंच राजु डुंबरे यांनी सांगितले. माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू पथकाने घटनास्थळी येऊन एका बास्केटच्या साहयाने या उद मांजराला बाहेर काढून तिथेच सोडले. या उदमांजराला जीवनदान देण्याकरिता राजु डुंबरे, राहुल पठारे, अमित पठारे, महेश पठारे, अक्षय पठारे, योगेश पठारे, सागर पठारे, संतोष पठारे या ग्रामस्थांची मदत झाली.

Web Title: Release of Sambar and Udmangra lying in the well