शिरसोडीकरांनी असा पटकावला कोरोनामुक्तीचा मान

डाॅ. संदेश शहा
Monday, 1 June 2020

शिरसोडी गावात मुंबई येथून 17 मे रोजी आलेले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शिरसोडी हे गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते.

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील शिरसोडी हे उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील गाव कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती सरपंच अश्विनी विजय पोळ व ग्रामसेवक मोहन डोणगावे यांनी दिली. 

शिरसोडी गावात मुंबई येथून 17 मे रोजी आलेले दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शिरसोडी हे गाव प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी या गावास भेट देवून गाव कोरोनामुक्त करण्याचे नियोजन केले. त्यानुसार 17 मे ते 30 मे या कालावधीत आरोग्य विभागामार्फत गृह भेटी देऊन प्रत्यक्ष कोरोना रुग्ण शोध व संशयित रुग्णास संदर्भ सेवा देण्यात आली. या वेळी पंचक्रोशीतील ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद यादव यांनी केली. 

गुड न्यूज गुड न्यूज : कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा रेट मंदावतोय; वाचा सविस्तर आकडेवारी

या वेळी हात धुणे, मास्क वापर, सामाजिक आंतर ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात आली. या कालावधीत एकही कोरोना रुग्ण आढळून न आल्याने प्रतिबंधित शिरसोडी हे गाव कोरोनामुक्त झाल्याची अधिकृत घोषित करण्यात आली.  आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत प्रशासन, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, कोरोना दक्षता समिती यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. या कालावधीत शिरसोडी येथे काम केलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गावकऱ्यांनी पुष्पवर्षाव करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ग्रामसेवक मोहन डोणगावे यांनी प्रास्ताविक,  तर आरोग्य सेवक देवेंद्र उत्तेकर यांनी सूत्रसंचलन केले.   विस्तार अधिकारी दिलीप जगताप यांनी आभार मानले. या वेळी आरोग्य सेविका रोहिणी म्हेत्रे, रुपाली बडंगर, आरोग्य सहाय्यक नामदेव माने, पोलीस पाटील राजेंद्र शिंदे, विजय शिंदे, नाना चव्हाण, माजी सरपंच पोपट शिंदे,  शत्रुघन शिंदे, रमेश जाधव, सौदागर पाडोळे, ग्रामपंचायत शिपाई पंडित खरात व नवनाथ पेठकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief of Corona disease of Shirsodi villagers