पूरग्रस्तांना बारामतीतून मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

बारामती येथील युवकांनी व नागरिकांनी एकत्र येत पुरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.

बारामती शहर : बारामती येथील युवकांनी व नागरिकांनी एकत्र येत पुरग्रस्त भागातील नागरिकांना मदतीचा हात दिला आहे.

दरम्यान, पूरग्रस्तांचे जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याच्या उद्देशाने योगेश चिंचकर, प्रफुल्ल जराड, परवेज मुलाणी, अजित कणसे, परवेज सय्यद, रोहिदास निकम, निलेश भापकर, अर्जुन हंगे, देविदास देशमाने, रोहित चव्हाण, बंडू जाधव, संजय काळे, देवेंद्र घोडके, ओंकार पंडित, राहुल जराड, अजित ननवरे, तनीष परकाळे यांनी आणि याबरोबरच शिवछत्रपती ढोलपथक, खंडोबा प्रतिष्ठान, नवरत्न एकता मंडळ, नवयुग मित्रमंडळ, जगताप मळा मित्रमंडळ, शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, विद्या प्रतिष्ठान सुपे, भवानीनगर मित्रमंडळ, फरेरो कंपनी यांनी जवळपास चार लाख किंमतीच्या वस्तूंची मदत पूरग्रस्तांना वितरित पाठविली आहे. बारामती परिसरातील खंडोबानगर मोरगाव रोड येथील नागरीकांनी देखील मदत केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Relief for flood victims in kolhapur and sangli

टॅग्स