नदीत अडकलेल्या दांपत्याची सुटका

संदीप घिसे 
सोमवार, 16 जुलै 2018

गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुरामध्ये मोई येथील स्मशानभूमी अडकलेल्या वृद्ध दांपत्याची आणि त्यांच्या चार कुत्र्यांची पिंपरी चिंचवड अग्निशामक विभागाने सोमवारी (ता.16) दुपारी सुखरुप सुटका केली. 

पिंपरी (पुणे)- गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पुरामध्ये मोई येथील स्मशानभूमी अडकलेल्या वृद्ध दांपत्याची आणि त्यांच्या चार कुत्र्यांची पिंपरी चिंचवड अग्निशामक विभागाने सोमवारी (ता.16) दुपारी सुखरुप सुटका केली. 

राम लखन शर्मन (वय 75) आणि मालन राम शर्मन (वय 70) दोघेही सध्या रा. नवी स्मशानभूमी, मोई) अशी पुरातून बाहेर काढलेल्या वृद्ध दांपत्याचे नाव आहे. अग्निशामक अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास मोई येथील इंद्रायणी नदीपात्रात असलेल्या नवीन स्मशान भूमीत एक वृद्ध दांपत्य अडकले असल्याची माहिती सरपंच निलेश गवारे यांनी मुख्य अग्निशामक अधिकारी किरण गावडे यांना दिली. त्यानुसार अग्निशामक विभागाची एक रेस्क्‍यू व्हॅन आणि दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. रबरी बोट टाकुन प्रथम राम शर्मन आणि त्यांची दोन कुत्री यांना बाहेर काढण्यासाठी बोटीत घेतले. मात्र, मालन या मागे राहिल्याने कुत्र्यांनी पुन्हा बोटीतून उडी मारत आपले नेहमीचे ठिकाण गाठले. त्यानंतर मालन शर्मन यांना बाहेर काढले. त्यावेळीदेखील कुत्रे बोटीत आले नाहीत. अखेर तिसऱ्यांदा बोट नेत चार कुत्र्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.

पाण्याची पातळी वाढत चालली आहे. तर अग्निशामक विभागाने त्यांना वेळीच बाहेर काढले नसते तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. शर्मन दांपत्य गेल्या काही महिन्यापासून नवीन स्मशान भूमी परिसरात वास्तव्यास आहे. मासेमारी करून ते आपली उपजिविका करतात.

Web Title: Relieved couple from river in pimpari